सोलापूरला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द; जिल्हाधिकाऱ्यांवर नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 05:51 AM2018-09-23T05:51:59+5:302018-09-23T05:52:13+5:30
टायर किंवा लाकडे जाळून त्यामध्ये मीठ टाकून तयार झालेला धूर आकाशात सोडला तर प्रदुषणाला धोका उत्पन्न होईल.
सोलापूर - टायर किंवा लाकडे जाळून त्यामध्ये मीठ टाकून तयार झालेला धूर आकाशात सोडला तर प्रदुषणाला धोका उत्पन्न होईल. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग ताबडतोब थांबवा अन्यथा गुन्हे दाखल केले जातील, अशा सूचना राष्टÑीय हरित लवादाकडून आल्याने सोलापूर जिल्हाधिकाºयांनी शनिवारी जिल्हाभर आयोजित केलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग रद्द केला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गावागावात असा प्रयोग करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे १०४० गावांमध्ये तयारी झाली होती. परंतु राष्टÑीय हरीत लवादाचे असीम सरोदे यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन करुन सकाळीच या गंभीर गुन्ह्याची कल्पना दिली. दोन्ही पोलिस अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना याबाबतची कल्पना दिली.