नियोजनशून्य कारभारामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:11+5:302021-04-10T04:22:11+5:30
महूदची लोकसंख्या १७ ते १८ हजार इतकी आहे. गावची ताण भागवण्यासाठी चिकमहूद येथील तामजाई विहीर, महूद ग्रामीण पाणीपुरवठा व ...
महूदची लोकसंख्या १७ ते १८ हजार इतकी आहे. गावची ताण भागवण्यासाठी चिकमहूद येथील तामजाई विहीर, महूद ग्रामीण पाणीपुरवठा व शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून असा तीन ठिकाणाहून पाणीपुरवठा केला जातो. मार्चअखेर ८० ते ८५ टक्के पाणीपट्टीची वसुली झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य सांगतात. ग्रामपंचायतीकडून कधी ४ दिवस तर कधी ५ दिवसातून तेही सकाळी ८ वाजता सुटणारे पाणी रात्री अपरात्री ९ ते १० वाजता सोडले जात असल्यामुळे महिला नागरिक अबालवृद्धांची धावपळ होत आहे.
महूद ग्रामपंचायतीने नियोजन करून किमान दोन दिवसातून पुरेशा दाबाने एकवेळ मुबलक पाणी सोडावे. गावातील पाणीटंचाई दूर करावी या मागणीसाठी ग्रा.पं. सदस्य दिलीप नागणे, यशवंत खबाले, गणेश लवटे, सदस्या भाग्यश्री बाजारे, रोहिणी चव्हाण, विद्या कांबळे, वनिता कोळेकर, सुनीता कांबळे यांच्यासह आठ सदस्यांनी गटविकास अधिकारी संतोष राऊत यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले आहे.
कोट ::::::::::::::::
शिरभावी योजनेतून वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे गावात पाणी सोडण्यासाठी व्यत्यय येत आहे. तामजाई विहिरीवरील वीजपुरवठा पाण्याअभावी पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तर गावातील ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या विहिरीत पुरेसे पाणी नाही. गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परंतु नियोजन करून यापुढे गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल.
- संजीवनी लुबाळ, सरपंच