Republic Day; विद्यार्थ्यांमधून साकारली 26 जानेवारीची कलाकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:17 PM2020-01-26T12:17:52+5:302020-01-26T12:24:26+5:30
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील यशवंत शाळेचे नाविन्यता
करकंब : 26 जानेवारी या प्रारजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भोसे (ता. पंढरपूर) येथील यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायात 191 विद्यार्थ्यांमधून 26 जानेवारी नावाची कलाकृती साकारली.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्याध्यापक भगवान मडके, उपमुख्याध्यापक उल्हास माने व पर्यवेक्षक के. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक अमोल डुबल यांच्या संकल्पनेतून त्यांच्या सहकारी शिक्षकांनी 191 विद्यार्थ्याच्या माध्यमातून 26 जानेवारीची कलाकृती साकारली. यामध्ये 26 साठी 31 विद्यार्थी तर 160 विद्यार्थ्यांमधून जानेवारी आकाराला आले, शिवाय डुबल यांनी तिरंगी टोप्यांचा वापर करुन तिरंगाचे वेगळे स्वरुप दिल्याने 26 जानेवारी नाव उदयास आल्याने शाळेत वेगळीकता दिसून येत होती. कार्यक्रमाला आरएसपी पथक प्रमुख कैलास कोकणी यांनी 78 मुला मुलींच्या सहभागातून आरएसपी पथकाने संचलन केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
-----------------------------
मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून
अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था
येथी शाळेचे मुख्याध्यापक मडके यांच्या संकल्पनेतून 26 जानेवारी कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था सरळ रेषेत करण्याऐवजी अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था करुन कार्यक्रमात आगळीकता निर्माण केल्याने कुतुहल निर्माण झाले होते.