सोलापुरातील अरविंद धाम; इनामदारांची स्मृती चिरंतन ठेवणारं काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 07:35 PM2019-11-09T19:35:13+5:302019-11-09T19:37:07+5:30

निवृत्त पोलीस अधिकाºयांच्या भावना : सोलापूरकरांशी जिव्हाळ्याचे संबंध; पोलिसांसाठी सर्वोत्तम वसाहत

Arvind Dham in Solapur; The task of keeping the memory of the rewarded forever | सोलापुरातील अरविंद धाम; इनामदारांची स्मृती चिरंतन ठेवणारं काम

सोलापुरातील अरविंद धाम; इनामदारांची स्मृती चिरंतन ठेवणारं काम

googlenewsNext
ठळक मुद्दे१९८० दरम्यान अरविंद इनामदार हे सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक पदावर होते़जवळपास ९ महिने सोलापुरात होते़ ते शिस्तप्रिय होतेपोलीस हे नेहमी टापटीप असले पाहिजेत़ यासाठी ते खूप शिस्तप्रिय होते

रेवणसिद्ध जवळेकर/रुपेश हेळवे

सोलापूर : एक चालतं-बोलतं विद्यापीठ म्हणून अरविंद इनामदार यांची पोलिसांमध्ये ख्याती होती. त्यांनी खात्याला लावलेली शिस्त अन् पोलिसांना सातत्याने आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे अरविंद इनामदार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक असताना त्यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न मार्गी लावला. आज ते आपल्यातून निघून गेले तरी त्यांच्या नावाने असलेले अरविंद धाम त्यांची स्मृती चिरंतन ठेवणारं आहे, या शब्दात पोलीस दलातील निवृत्त अधिकाºयांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

पोलीस अन् जनता यातील दरी कमी व्हावी आणि सर्वसामान्यांना पोलीस खाते जेव्हा आपलेसे वाटू लागेल, तेव्हाच पोलिसांची प्रतिमा उंचावल्यासारखी आहे, असे ते नेहमी म्हणत असत. पोलिसांमधील माणूस म्हणून काम करताना त्यांनी खात्यात मात्र शिस्तीचेच धडे देत असत. कसं बोलावं, कसं वागावं यावरच त्यांचा कटाक्ष असायचा. पोलीस ठाण्यात अथवा चौकीत तक्रार देण्यासाठी आलेल्याला खुर्ची द्या, पाणी द्या अन् त्याचे नीट ऐकून घ्या. असे केले तर तक्रारदाराचे निम्मे दु:ख हलके होते, असे ते नेहमी म्हणायचे. 
आज त्यांचे विचार दलातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांनी आचरणात आणावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल, या शब्दात निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते, पंढरीनाथ मांडरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अधीक्षकच नव्हे तर कडक शिक्षकही होते...
- १९८० दरम्यान अरविंद इनामदार हे सोलापूर ग्रामीणमध्ये पोलीस अधीक्षक पदावर होते़ ते जवळपास ९ महिने सोलापुरात होते़ ते शिस्तप्रिय होते़ पोलीस हे नेहमी टापटीप असले पाहिजेत़ यासाठी ते खूप शिस्तप्रिय होते़ केसापासून पायाच्या नखापर्यंत ते शिस्त पाहत होते़ प्रत्येक कर्मचारी हा शिस्तीत असला पाहिजे असे त्यांचे मत होते़ एखादा कर्मचारी जर आपली टोपी खांद्याला लावलेला दिसला तरी त्यावेळी ते कारवाई करत होते़ याचबरोबर दिवसाचे काम पूर्ण करूनच घरी जात होते़ 

पोलिसांच्या आरोग्याचाही विचार- अनु शर्मा
- पोलिसांनी नेहमी स्टॅन्डर्ड जीवन जगावे़ ते नेहमी फिट असावेत़ पोलिसांच्या कुटुंबीयासाठी राहण्यासाठी चांगली व्यवस्था असावी़ यासाठी नेहमी प्रयत्न करून पोलिसांसाठी माजी पोलीस अधीक्षक अरविंद इनामदार यांनी सोलापुरात कॉलनी निर्माण केली़ चाळीस घरांची एक बिल्डिंग अशा अकरा बिल्डिंग निर्माण केल्या़ पण पोलिसांची होणारी धावपळ, यामुळे त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते ही बाब लक्षात घेऊन त्यांचा व्यायाम व्हावा यासाठी बिल्डिंगला लिफ्ट न बसवण्याचा निर्णय माजी पोलीस महासंचालक तथा सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक इनामदार यांनी घेतला होता. त्यांनी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी खूप प्रयत्न केले, अशी आठवण  तत्कालीन लाईन अंमलदार अनु वर्मा यांनी दिली़ 

सोलापुरात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना घरे मिळाली पाहिजे, यासाठी अरविंद इनामदार यांनी मोलाचे प्रयत्न केले. कर्तव्य पार पाडण्याबरोबर सर्वसामान्यांना चांगली वागणूक  द्या, असे ते नेहमी सांगायचे. अरविंद धामच्या माध्यमातून त्यांचे सतत स्मरण होत राहील. 
-अभय कटाप, निवृत्त कार्यालयीन अधीक्षक, सोलापूर ग्रामीण पोलीस दल.

पोलीस दलात भरती झाल्यावर एक वर्षाचे प्रशिक्षण होते. त्यावेळी प्राचार्य म्हणून अरविंद इनामदार यांनी जे धडे दिले, तेच धडे मला पोलीस दलात काम करताना कामाला आले. सोलापुरात त्यांनी जी वसाहत निर्माण केली, आज तीच वसाहत स्व. अरविंद इनामदार यांच्या विचारांची प्रेरणा देत राहील.
-मोहन विधाते,
निवृत्त सहायक पोलीस आयुक्त. 

अरविंद इनामदार खूप शिस्तप्रिय अधिकारी होते़ त्यांनी पोलीस खात्याला पूर्ण शिस्त लावली होती. गुन्हेगारांवर त्यांचा चांगलाच वचक होता़ त्यांच्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांना चांगली वसाहत मिळाली़ अरविंद धामच्या माध्यमातून त्यांचे नेहमीच स्मरण होत राहील.  
- अरुण कुलकर्णी,         
निवृत्त पीएसआय

Web Title: Arvind Dham in Solapur; The task of keeping the memory of the rewarded forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.