बी.आर.एस ज्या वेगाने महाराष्ट्रात येतोय, त्याच वेगाने ते परत जाईल; काँग्रेस प्रवक्त्याचा टोमणा
By Appasaheb.patil | Published: June 26, 2023 08:04 PM2023-06-26T20:04:49+5:302023-06-26T20:05:23+5:30
राजकारणासाठी वापर होऊ न देणारी ही महाराष्ट्राची सुज्ञ जनता आहे.
सोलापूर: महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची जनता आहे. पंढरपूर ही दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीनिमित्त पंधरा-वीस लाख लोक येतील या गर्दीचा उपयोग राजकारणासाठी करून घ्यावा म्हणून बी.आरएस ३०० ते ५०० गाड्या घेऊन महाराष्ट्रात येत आहेत, राजकारणासाठी वापर करू न देणारी ही जनता आहे ज्या वेगाने ते येत आहेत, त्याच वेगाने त्यांना परत पाठवून देतील असा टोमणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
राजकारणासाठी वापर होऊ न देणारी ही महाराष्ट्राची सुज्ञ जनता आहे. सध्या महाराष्ट्राचं राजकारण फार गडुळ झालेलं आहे, अशातच बाहेरच्यांनी यावं व इथल्या लोकांवर राज्य करावं हे कदापिही इथल्या जनतेला मान्य होणार नाही. त्यामुळे यापूर्वीही अनेक बाहेरचे पक्ष महाराष्ट्रात आले पण पावसाळ्यातल्या छत्रीप्रमाणे त्यांचे अस्तित्व दिसून आले, त्यामुळे बी.आर. एसचा महाराष्ट्रात प्रभाव पडणार नाही असेही प्रा. काकासाहेब कुलकर्णी म्हणाले.