आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

By Appasaheb.patil | Published: June 14, 2023 06:51 PM2023-06-14T18:51:16+5:302023-06-14T18:51:33+5:30

आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात.

Ashadhi Ceremony 2023; 48 tons of garbage was removed after cleaning the Chandrabhaga river bed | आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

आषाढी सोहळा २०२३; चंद्रभागा नदी पात्राची स्वच्छता करून काढला ४८ टन कचरा

googlenewsNext

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. येणारे भाविक प्रथमत: चंद्रभागा स्नान करून श्री विठ्ठल - रुक्मिणी पद दर्शन, कळस दर्शन तसेच नगर प्रदक्षिणेला प्राधान्य देतात. पवित्र स्नान करताना भाविकांना पाण्यात टाकण्यात आलेल्या निर्माल्य, फाटकी कपडे, कचरा याचा त्रास होऊ नये. तसेच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता मोहिम सुरु केली असून, यापूर्वी चंद्रभागा नदीपात्रातून ३२ टन तर आज १४ जून रोजी १६ टन असा एकूण ४८ टन कचरा काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

चंद्रभागा नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत असून, पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य , कपडे, कचरा नदीपात्रात दिसून येत असल्याने नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर जेसीबी, डंपरच्या सहाय्याने नदी पात्रातील निर्माल्य बाहेर काढले जात आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीत येत्या २९ जून रोजी आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. बुधवार १४ रोजी नगरपालिकेचे ४० कर्मचारी स्वच्छता मोहिम राबवत आहेत. यात आणखी वाढ करुन दररोज १०० कर्मचार्‍यांव्दारे यात्रा कालावधीपर्यंत स्वच्छता मोहिम सुरु ठेवण्यात येणार आहे. 

त्याचबरोबर नदीपात्रात जलप्रदुषण होऊ नये यासाठी मोकाट गायी, म्हैस आदी प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात येत असून, नदीपात्रात धुतल्या जाणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात येत असल्याचेही मुख्याधिकारी माळी यांनी सांगितले.

Web Title: Ashadhi Ceremony 2023; 48 tons of garbage was removed after cleaning the Chandrabhaga river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.