आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 11:46 AM2018-07-13T11:46:52+5:302018-07-13T11:51:17+5:30

Ashadhi Vari; 866 hotels in Pudri and 557 home inspectors and tenants check! | आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी !

आषाढी वारी ; पंढरीतील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी !

Next
ठळक मुद्देचोरांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांचे एक पथक महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील छेडछाडविरोधी पथकवारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त

अमित सोमवंशी
सोलापूर :  पंढरपुरातील आषाढी वारीच्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठी तयारी केली आहे़ त्याच अनुषंगाने पंढरपूर शहरातील ८६६ हॉटेल तर ५५७ घरमालक व भाडेकरुंची तपासणी पोलिसांकडून करण्यात आली. याशिवाय वारीसाठी ३४१ अधिकारी आणि ४ हजार ५१० पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे़

आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविकांबरोबरच काही  हौसे गवसेही येतात. चोरांवर लक्ष देण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठीदेखील छेडछाडविरोधी पथक तयार करण्यात आले आहे. वारीला गालबोट लागू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंढरपुरात वाहतुकीची कोंडी होऊन  शहर ठप्प होऊ नये, यासाठी  शहराबाहेरच सर्व मार्गावर  स्वतंत्र पार्किंगची सोय  करण्यात आली आहे.  घातपातविरोधी पथकाचीही वारीवर नजर आहे. वारीच्या अनुषंगाने बीडीडीएस पथकाने चार रंगीत तालीम घेतल्या. 

वारी अनुषंगाने केलेली प्रतिबंधक कारवाई

  • - सीआरपीसी १०९-१३
  • - सीआरपीसी ११०-०९
  • - सीआरपीसी १५१(३)- ४
  • - महा. पोलीस अधि़ कलम १२२ क़- ३
  • - अवैध दारु धंद्यावर केलेली कारवाई - ८९
  • - फरार / पाहिजे असलेले आरोपी अटक -०७
  • - दहशतवाद विरोथी पथक (एटीसी सेल) चेकिंगची कारवाई
  • - घरमालक / भाडेकरु चेकिंग - ५५७
  • - स्फोटके / फटाके विक्रेते चेकिंग - २३४
  • - दुचाकी / चारचाकी वाहन विक्रेते चेकिंग - ३६१
  • - हॉटेल / लॉजेस चेकिंग - ८६६
  • - सायबर कॅफे चेकिंग - २४२
  • - मोबाईल सिमकार्ड विक्रेते चेकिंग - ६३१
  • - जिल्ह्यातील अवैध वाहतूक कारवाई
  • - ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह केसेस - ५२
  • - विनानंबर प्लेट / फॅन्सी नंबर प्लेट कारवाई - ७८
  • - अवैध प्रवासी वाहतूक कारवाई- ११४
  • - बिगर लायसन्स धारकांवर केलेले केसेस -६५
  • - ट्रिपल सीट केसेस - ३६९
  • - बेदरकारपणे वाहन चालविणाºयांवरील कारवाई - १०
  • - वारीसाठी स्थापन केलेली विशेष पथके
  • - पिक पॉकेटिंग व चेन स्नॅचिंग विरोधी पथके - ०३

Web Title: Ashadhi Vari; 866 hotels in Pudri and 557 home inspectors and tenants check!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.