आषाढी वारी विशेष ; डॉ. सुमेध अंदूरकर वारकºयांच्या आरोग्याचा सेवेकरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:06 PM2018-07-20T15:06:02+5:302018-07-20T15:06:31+5:30
२००७ सालची गोष्ट. मी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. पहाटे दोन-अडीचची वेळ असेल. आळंदीच्या मंदिरात कीर्तन चालू असताना एक वारकरी बसल्या ठिकाणी कोसळला. मंदिराच्या चारही बाजूला राहुट्या होत्या. अॅम्ब्युलन्स जाणे शक्य नव्हते. इतर वारकºयांनी उचलून त्याला आळंदीच्या आरोग्य केंद्रात आणले. त्या वारकºयाचे नाव माहीत नव्हते, सोबत नातेवाईकही नव्हते. तपासणी केल्यानंतर वारकºयाला हृदयविकाराचा धक्का बसल्याचे निष्पन्न झाले.
प्रथमोपचार केल्यानंतर आम्ही त्याला घेऊन पुण्याला गेलो. तिथे गेल्यानंतर नातेवाईकांना माहिती देऊन बोलावून घेतले. असाच दुसरा प्रकार. रिंगणावेळी मानाचा घोडा घसरू नये म्हणून फरशीवर बारदाना टाकला जातो. घोडा पुढे गेला की तोच बारदाना उचलून पुढे टाकला जातो. हे करीत असताना एक वृद्ध वारकरी बारदान्यावरून घसरून पडला. त्याच्या मणक्याचे हाड मोडले. गर्दीतून वाट काढीत त्या वारकºयाला आरोग्य केंद्रात आणले आणि पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन जावे लागले...
पण १० वर्षांपूर्वी आळंदीमध्ये केलेल्या कामाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. आषाढीच्या वारीत आरोग्य विभागाला २४ तास काम करावे लागते. पण हे काम अनेकांच्या लक्षात येत नाही. या वर्षी मी सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रुजू झालोय. पालखी मार्ग असो वा परिसरातील आरोग्य केंद्राचे कर्मचारी सेवा बजावून दमून जातात. पण मी माझ्या सर्व सहकाºयांना सांगितले आहे की, वारीमध्ये सहभागी झालेले लोक भाऊक असतात. त्यांना फक्त पंढरपूरचा विठ्ठल दिसतो. कामाचा कितीही ताण आला तरी त्यांच्याशी प्रेमाने वागा. एरव्ही आपण आरोग्य खात्याचे कर्मचारी असतो.
आता आपण वारकºयांचे सेवेकरी होऊया. त्यांची वारी सुकर व्हावी, यासाठी त्यांच्या वेदनेवर फुंकर घालूया.
वारीला इव्हेंट मॅनेजर नाही. पण वारीतील शिस्त ही शासकीय यंत्रणेला खूप काही शिकायला देणारी आहे. यावर्षीही आम्ही जिल्हा परिषदेसह सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून काम करीत आहोत. आरोग्य दूत ही संकल्पना वारकºयांसाठी खूप चांगली ठरत आहे. बाहेरून ४० जणांचे पथक ग्रामीण रुग्णालयांच्या सेवेत आले आहे. पंढरपूरच्या वाटेवर येणारे मरण चांगले मानले जाते. नदीपात्रात अपघातही होतात. अशा वेळी आरोग्य विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. हीच त्यांची वारी असते.
शब्दांकन : राकेश कदम