आषाढी वारी २०२४; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत दंग; धरला वारकऱ्यांसह फुगडीचा फेर
By Appasaheb.patil | Updated: July 17, 2024 03:09 IST2024-07-17T03:07:52+5:302024-07-17T03:09:53+5:30
पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांना आणि मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आषाढी वारी २०२४; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत दंग; धरला वारकऱ्यांसह फुगडीचा फेर
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसह फेर धरला तसेच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह फुगडी देखील घालत विठू नामाचा गजर केला. पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी' या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांना आणि मान्यवरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाढते तापमान नियंत्रणात आणण्यासाठी वृक्ष लागवड हा एकच पर्याय असून ती काळाची गरज आहे, त्यामुळे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यातही बहुउपयोगी वृक्ष असलेल्या बांबू लागवडीला प्राधान्य दिले असून राज्यात २० लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्यात येत आहे. 'एक वारकरी एक झाड' हा अभिनव उपक्रम देखील राबविण्यात येणार असून वारीतील पालखी मार्गावर अधिकाधिक वृक्ष लागवड व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे. तसेच मिलेट्सची लागवड वाढवण्यासाठी लातूर जिल्ह्यात मिलेट्स क्लस्टर देखील आपण करत असल्याचे याप्रसंगी सांगितले.