नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान

By Appasaheb.patil | Published: July 17, 2024 03:13 AM2024-07-17T03:13:17+5:302024-07-17T03:14:16+5:30

आषाढी एकादशी ; दर्शन रांगेतून निवडला मानाचा वारकरी

ashadhi wari A couple from Nashik district got the honor of performing official mahapuja of Vitthal along with the Chief Minister | नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान

नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसह विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला मान

पंढरपूर : आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मानाचा वारकरी म्हणून बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) या दापत्याची निवड करण्यात आली. यामुळे अहिरे दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विठ्ठलाची शासकिय महापूजा करता येणार आहे.

आषाढीला एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवेळी मानाच्या वारकरी म्हणून दर्शन रांगेतून शेतकरी भाविकाची निवड केली जाते. यंदाच्या वर्षी हा बाळू शंकर अहिरे ( वय ५५) व आशाबाई बाळू अहिरे ( वय ५०, रा. अंबासन, ता. सटाणा, जिल्हा नाशिक) यांना मिळाला असून हे पती-पत्नी मागील १६ वर्षापासून विठुरायाचे यात्रा करत आहेत.

Web Title: ashadhi wari A couple from Nashik district got the honor of performing official mahapuja of Vitthal along with the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.