मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आषाढीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:08+5:302021-05-29T04:18:08+5:30

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून पालखी ...

Ashadhi's decision will be taken in the cabinet meeting | मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आषाढीचा निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार आषाढीचा निर्णय

Next

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांनी ही मािहती दिली.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रिमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, यांनीही वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.

-----

आषाढी पालखी सोहळ्यात प्रमुख पालख्याचे मार्ग

आषाढी पालखी सोहळ्यातील प्रमुख पालख्याचे मार्ग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाेहळा आळंदी-पुणे-सासवड-लोणंद-फलटण-नातेपुते-माळशिरस-वेळापूर-भंडिशेगा-वाखरी-पंढरपूर अशा मार्गाने जातो. वाखरी येथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते. तर श्री तुकाराम महाराज महाराजांचा पालखी सोहळा देहू-पुणे-लोणीकाळभोर,यवत,वरवंड, बारामती,इंदापूर,अकलूज,वाखरी,पंढरपूर या मार्गाने जातो. वाखरी येथे शेवटचे रिंगण होते.

---

Web Title: Ashadhi's decision will be taken in the cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.