आशासेविकांची कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:24 AM2021-05-20T04:24:00+5:302021-05-20T04:24:00+5:30
पटवर्धन कुरोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायती व ...
पटवर्धन कुरोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायती व ग्रामस्थांनी लोकसहभागातून कोविड सेंटर उभारावे, असे आवाहन केले आहे. त्यासाठी ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने कोविड सेंटर उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. ग्रामस्थांमधून लोकवर्गणीसाठी प्रतिसाद मिळत असताना गेल्या दीड वर्षापासून जीव धोक्यात घालून लढा देणाऱ्या आशासेविका मेघा गोसावी, संगीता उपासे, सुवर्णा डावरे, अनिता तवटे, शुभांगी तवटे, शुभांगी कदम या सहा आशासेविकांनी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, सरपंच गणेश उपासे यांच्याकडे ही आर्थिक मदत देऊ केली आहे. यावेळी शिवाजी नाईकनवरे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. पटवर्धन कुरोली कोविड सेंटर उभारल्यामुळे परिसरातील आव्हे, देवडे, पिराची कुरोली, तरटगाव, शेवते, खेडभोसे, पेहे, नांदोरे, परिसरातील रुग्णांची सोय होणार आहे.
फोटो ::::::::::::::
कोविड सेंटरसाठी आर्थिक मदत ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर गिड्डे व सरपंच गणेश उपासे यांच्याकडे सुपूर्द करताना आशासेविका.