सोलापूर बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक लुणावत
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 20, 2023 10:14 PM2023-02-20T22:14:00+5:302023-02-20T22:14:40+5:30
सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक लुणावत, तर उपाध्यक्षपदी प्रकाश वाले यांची निवड झाली आहे.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर: सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी अशोक लुणावत, तर उपाध्यक्षपदी प्रकाश वाले यांची निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर झाली.
अशोक लुणावत यांचे नाव सीए राजगोपाल मिणियार सुचविले, तर त्यांना कल्याणराव काळे यांनी अनुमोदन दिले. वाले यांचे नाव सीए किसन माळी यांनी सुचविले, तर राजगोपाल झंवर यांनी त्यांना अनुमोदन दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर पाटील, दीपक मुनोत, डॉ.अशोक सुरवसे, संगीता फाटे, अस्मिता गायकवाड, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी ढवळे आदी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"