कोंबडवाडीच्या सरपंचपदी अश्विनी राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:02+5:302021-02-24T04:24:02+5:30
अनगर : लोकनेते स्व. बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन स्थापनेपासून आजपर्यंत बिनविरोध निवडीची परंपरा यंदाही ...
अनगर : लोकनेते स्व. बाबुराव आण्णा पाटील अनगरकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन स्थापनेपासून आजपर्यंत बिनविरोध निवडीची परंपरा यंदाही जपली. कोंबडवाडीसह मंडलातील विविध गावच्या सरपंच आणि उपसरपंचांची निवड बिनविरोध झाली. कोंबडवाडीच्या सरपंचपदी अश्विनी महादेव राऊत-माळी तर उपसरपंच म्हणून श्रीधर भागवत थिटे यांची निवड करण्यात आली. थिटे हे भाभा अणू शक्ती केंद्र मुंबई येथून कृषी संशोधक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.
माजी आमदार राजन पाटील, जिल्हा परिषद सदस्य तथा लोकनेते शुगरचे अध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या काही ग्रामपंचायती कार्यरत आहेत. खंडोबाची वाडीच्या सरपंचपदी संदीप बळीराम शिंदे तर
उपसरपंच तर उपसरपंचपदी माया तानाजी गुंड यांची निवड करण्यात आली. नालबंदवाडीच्या सरपंचपदी स्नेहल शंकर गुंड तर उपसरपंच बळीराम थिटे यांची निवड करण्यात आली. गलंदवाडी- पासलेवाडीच्या सरपंचपदी कविता सोमनाथ मोरे, उपसरपंच अनिल रमेश माने यांची निवड करण्यात आली.
कुरणवाडी(अ.)च्या सरपंचपदी महादेव मोरे तर उपसरपंचपदी सुरेश शाहू शिंदे यांची निवड करण्यात आली.
बिटलेच्या सरपंचपदी सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अर्चना दाजी काळे यांनी काम पाहिले. अध्यासी अधिकारी म्हणून दीपक घाडगे, शीलादेवी दाढे, सुधाकर बंडगर, परसराम कराळे, उर्मिला गोरे, एस.बी. शिंदे यांनी काम पाहीले. त्यांना ग्रामविकास अधिकारी सचिन कदम, ग्रामसेवक मंजुश्री कारंडे, कैलास मोरे, भालचंद्र गुंड, मनिषा देवकर, गणेश वेदपाठक यांनी सहाय्य केले. बिनविरोध निवडलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांचा माजी आमदार राजन पाटील, अजिंक्यराणा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.
---
फोटो : २३ अनगर
कोंबडवाडीच्या सरपंचपदी अश्विनी राऊत तर उपसरपंचपदी श्रीधर भागवत थिटे यांची निवड झाली. त्यांचा सत्कार करताना माजी आमदार राजन पाटील, अजिंक्यराणा पाटील, दीपक घाडगे, सचिन कदम