पाण्याची मागणी करा, अन्यथा तालुक्याला मिळणारे पाणी कमी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:28 AM2021-09-09T04:28:10+5:302021-09-09T04:28:10+5:30
माळशिरस तालुक्यातील वीज, रस्ते, आपत्तीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसह इतर समस्यांसंदर्भात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत चर्चा करून ...
माळशिरस तालुक्यातील वीज, रस्ते, आपत्तीग्रस्तांच्या नुकसान भरपाईसह इतर समस्यांसंदर्भात आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठकीत चर्चा करून समस्या सोडविण्याबाबत सूचना केल्या.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिवामृतचे चेअरमन धैर्यशील मोहिते-पाटील, प्रांताधिकारी डाॅ. विजय देशमुख, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, पोलीस उपअधीक्षक निरज राजगुरू, नायब तहसीलदार तुषार देशमुख, भूमी अभिलेखच्या प्रिया पाटील, महावितरणचे अनिल वडर, शेती महामंडळाचे एम.एस. पोले, बाळासाहेब शिंगाडे, सौरऊर्जाकडील संयोग मोहिते, उपसभापती प्रतापराव पाटील, मामासाहेब पांढरे, मिलिंद कुलकर्णी, संग्रामसिंह जहागीरदार आदी उपस्थित होते.
रस्ते चौपदरीकरणात धर्मपुरी येथील शाळा बाधित झाली आहे. त्यासाठी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांनी तेथे येऊन पाहणी करावी. रोहित्र जोडणीसंदर्भात महावितरण अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सरपंच बाजीराव काटकर यांनी केली, तर गतवर्षी बोंडले गावात ओढ्याला आलेल्या पुरात गावातील सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय वाहून गेले आहे. त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. सध्या चालू असलेल्या रस्ते चौपदरीकरणात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर पाडण्यात आले आहे. शासनाने तातडीने या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करून द्यावी व बाधितांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बोंडले गावचे सरपंच विजय देशमुख यांनी यावेळी केली.
.............
सौर कृषी वाहिनीसाठी २१ जागांचे प्रस्ताव सादर
केंद्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायतीच्या वर्षानुवर्षे पडीक जमिनीत सौरऊर्जा प्रकल्प उभारून त्यात निर्माण होणारी वीज महावितरण कंपनीस वितरित केल्यास त्या भागातील शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा तर ग्रामपंचायतीला पडीक जागेतून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध होणार आहे. अशा या प्रकल्पाच्या माळशिरस तालुक्यात २१ जागांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यापैकी १४ जागांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती प्रकल्पाचे तांत्रिक अभियंता संयोग मोहिते यांनी दिली.
............
फोटो ०८अकलूज
080921\20210908_105141.jpg
माळशिरस तालुक्यातील समस्यांसंदर्भात आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांची अधिका-यासमवेत बैठक यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह मान्यवर