महामार्ग होणाऱ्या गावातले मूल्यांकन वाढले ; एकदम खरेदी-विक्रीचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:23 AM2021-07-29T04:23:20+5:302021-07-29T04:23:20+5:30
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकोट मतदारसंघातील अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील हायवेसमोरील जमिनींची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्याप्रमाणे ...
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकोट मतदारसंघातील अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील हायवेसमोरील जमिनींची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्याप्रमाणे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या कार्यालयाने परिपत्रक काढले आहे. याप्रमाणे जी यादी प्रसिद्ध केली आहे. त्या
यादीत गावातील हायवेसमोरील शेतजमिनीचे रेडी रेकनरप्रमाणे दर प्रतिचौरस मीटरमध्ये आकारणी करण्याचे आदेश झाले आहे. त्याप्रमाणे त्या जमिनीचे दर चौरस मीटरप्रमाणे आकारणी करण्यात येते; परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी हायवे झालेला नाही. याचा खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे.
-----
शेती दराप्रमाणे आकारणी करा
तालुक्यातील ५४ गावांतून हायवे जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात हायवे झालेला नाही. मूल्यांकनात मात्र वाढ झाली आहे. यामुळे जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाहीत. याकामी वारंवार संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांशी
संपर्क साधून वाढीव मूल्यांकन कमी होऊन मिळण्यासाठी विनंती केली. मात्र, असता शासनाच्या
आदेशाप्रमाणे व हायवे यादीप्रमाणे मूल्यांकन वाढल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणून मूल्यांकन शेती दराप्रमाणे आकारणी करण्यात यावी, असे आ. कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.
----
हायवेसमोरील जागेच्या खरेदी-विक्रीसाठी असलेले नवीन रेडी रेकनर दर भरमसाठ वाढल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत. व्यवहारच थंडावले असल्याने ती कमी करण्यासाठी मागणी केली आहे. याबाबत महसूलमंत्र्यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे अश्वासन दिले आहेत. ते दर कमी झाल्यास खरेदी-विक्री धारकांना दिलासा मिळणार आहे.
- सचिन कल्याणशेट्टी आमदार, अक्कलकोट