सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदारांच्या मालमत्ता बँकांच्या ताब्यात देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:43 AM2018-03-17T11:43:38+5:302018-03-17T11:43:38+5:30
कर्जबुडव्यांवर होणार कारवाई, निवासी उपजिल्हाधिकाºयांकडून प्रस्ताव पारित
सोलापूर : हेतुपुरस्सर कर्ज बुडविणाºया जिल्ह्यातील आणखी २० थकबाकीदारांच्या १० कोटींच्या मालमत्ता सरफेसी कायद्यान्वये बँकांच्या ताब्यात देण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तहसीलदारांना दिले आहेत. यामध्ये सोलापूर शहर, माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर आणि माळशिरस तालुक्यातील थकबाकीदारांचा समावेश आहे.
बँकांचे कर्ज बुडवून गब्बर झालेल्यांची संख्या जिल्ह्यातही वाढली आहे. कर्ज थकबाकी होत असताना बँकांकडून नोटिसा दिल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सरफेसी कायद्यान्वये मालमत्ता जप्तीसाठी बँका जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतात. सरफेसी कायद्यान्वये मालमत्ता जप्तीचे प्रस्ताव पूर्वी जिल्हाधिकाºयांकडून पारित केले जात होते.
आता हे अधिकार निवासी उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनामार्फत जुलै २०१५ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत २५० कोटींच्या थकबाकीप्रकरणी मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले होते. यानंतर दाखल झालेले प्रस्ताव निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी तत्काळ मार्गी लावले आहेत. सर्वात मोठे थकबाकीदार माळशिरस तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील उद्योजकाने डोंबीवली नागरी सहकारी बँकेकडील ५ कोटी १३ लाख रुपयांचे कर्ज थकविले आहे. त्याची मालमत्ता बँकेच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सर्वात लहान थकबाकीदार आयडीबीआय बँकेकडील आहेत. आयडीबीआयने ४ लाख ६१ हजार ८५८ रुपयांच्या थकबाकीप्रकरणी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील तहसीलदारांकडून मालमत्ता जप्त करून बँकांच्या ताब्यात दिली जाणार आहे.
ताबा देणारे कार्यालय आणि बँकेकडील थकबाकी
- उत्तर सोलापूर तहसील कार्यालय : समर्थ बँक (८१ लाख ९३ हजार ४७८), समर्थ बँक (१७ लाख ९८९), समर्थ बँक (३५ लाख ८६ हजार ५२७), आयडीबीआय बँक (४ लाख ६१ हजार ८५८), आयडीबीआय (८ लाख २३ हजार ७८४), इंडियन ओव्हरसीज बँक (३१ लाख १० हजार १०२), स्टेट बँक आॅफ इंडिया (५ लाख १० हजार ५७२), समर्थ बँक (८१ लाख ९३ हजार ४७८), सोशल बँक (१५ लाख ४८ हजार ७२३), बँक आॅफ महाराष्ट्र (१७ लाख ३१ हजार ७८९), स्टेट बँक आॅफ इंडिया (९ लाख ३ हजार ५५७), आयडीबीबाय (१६ लाख ५१ हजार १६३), स्टेट बँक आॅफ इंडिया (५ लाख १९ हजार ५११), आयडीबीआय (११ लाख ३ हजार ४७०) माढा : आयडीबीआय (१ कोटी ६ लाख १७ हजार १४३), जनता सहकारी बँक (६ लाख ६६ हजार ४२१), बार्शी : बँक आॅफ महाराष्ट्र (३४ लाख ९७ हजार २१०), दक्षिण सोलापूर : स्टेट बँक आॅफ इंडिया (९ लाख ९५ हजार ९१०), स्टेट बँक आॅफ इंडिया (१७ लाख २६ हजार २८०), माळशिरस : डोंबीवली नागरी सहकारी बँक (५ कोटी १३ लाख ८३ हजार ७१७).