पुणे घाटमाथ्यावर जोर ओसरला, विसर्ग घटला
By काशिनाथ वाघमारे | Published: July 27, 2023 08:44 PM2023-07-27T20:44:35+5:302023-07-27T20:44:46+5:30
उजनी प्लसमध्ये येण्यास सात टीएमसी गरज
सोलापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाला आहे. दौंड येथील विसर्गात घट झाली असून तो १६, ६२० क्युसेक झाला आहे. आता उजनीतील एकूण जलसाठा ५६.७१ टीएमसी झाला आहे. टक्केवारी मायनस ६.९५ वर आली आहे. मागील २४ तासात धरणात १.२४ टीएमसी पाणी आले आहे. धरण प्लस मध्ये येण्यासाठी फक्त ७ टीएमसी पाण्याची गरज आहे.
उजनीतील पाणीसाठा पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर पडणा-या पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसावर उजनी अनेक वेळा ओव्हर फ्लो झाले आहे. बुधवारपेक्षा गुरुवारी पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला. उजनी धरणाच्यावर १९ धरणांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ वेळेत चांगली वाढ झाली.
वडिवळे २७ मिमी, पवना ३२ मिमी, मुळशी ३४ मीमी, टेमघर ३० मीमी, वरसगाव १७ मीमी व पानशेतमध्ये १७ मीमी पावसाची नोंद झाली. इतर धरण क्षेत्रात नगण्य पाऊस झाला.
वरील धरणाची टक्केवारी:
पिंपळ जोगे ४.७९ टक्के, माणिकडोह ३७.१९ टक्के, येडगाव ८० टक्के, वडज ५१ टक्के, डिंभे ५४ टक्के, चिल्लेवाडी ७८ टक्के, कळमोडी १०० टक्के, चासकमान ८७ टक्के '' भामा आसखेड ६७ टक्के, वडीवळे ८९ टक्के, आंध्रा ७७ टक्के, पवना ७५टक्के, कासारसाई ८८.३९टक्के, मुळशी ७० टक्के, टेमघर ५०.३९ टक्के, वरसगाव ६७.४६ टक्के, पानशेत ७४.४९ टक्के, खडकवासला १०० टक्के.
वरीलपैकी चिल्लेवाडी येथून ११५३ क्युसेक, कळमोडी धरणातून १६९६ क्युसेक, वडिवळे धरणातून ४२२३ क्युसेक, कासारसाई येथून ४०० क्युसेक तर खडकवासला धरणातून १७१२क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
बंड गार्डन येथून १०३९१ क्युसेक तर दौंड येथून १६६२० क्युसेकने विसर्ग चालू आहे. दौंड येथून होणारा विसर्ग असाच राहिल्यास पाच दिवसात उजनी प्लस मध्ये येईल असा विश्वास धरण व्यवस्थापनाने व्यक्त केला.
धरणाची सद्यस्थिती
* एकूण पाणी पातळी : ४८९.९८० मीटर
* एकूण जलसाठा : ५६.७१ टीएमसी
* उपयुक्त जलसाठा : मायनस ६.९५ टीएमसी
* टक्केवारी: मायनस १२.९८ टीएमसी