दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार
By रवींद्र देशमुख | Updated: June 12, 2023 17:17 IST2023-06-12T17:16:11+5:302023-06-12T17:17:43+5:30
रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथे ही घटना घडली.

दुष्मनी इतकी मोठी की, कोयता अन तलवारीनं केला हल्ला! जखमीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार
सोलापूर: जुन्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी सहाजणांनी मिळून शंकर पावणे काळे (वय- ५०, रा. केडगाव, ता. करमाळा) या व्यक्तीला सहा जणांनी मिळून जंबिया, कोयता, तलवारीनं खुनी हल्ला करुन जखमी केले. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास केगाव येथे ही घटना घडली.
यातील जखमी शंकर काळे यांचे व जैन्या भामय्या काळे, बाप्या काळे, रेन्या काळे यांचे पूर्वीचे भांडण होते. याचा वचपा काढण्यासाठी वरील तिघांसह अन्य तिघांनी रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरासमोर शंकर याला गाठले. यातील मारेकऱ्यांनी जंबिया, कोयता, तलवारीने हल्ला चढवला. यात शंकर याच्या बरगडीला, पाठिस, हाताला जखम झाली. रक्कबंबाळ अवस्थेत त्याला सरकारी दवाखाना करमाळा येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.
सोमवारी रात्री सव्वा एकच्या सुमारास पत्नी सुधाबाई यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरु असून, प्रकृती स्थिर आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.