बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न...आरडाओरड केल्याने धूम ठोकली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:56+5:302020-12-11T04:48:56+5:30

करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण ...

Attempt to attack a leopard ... | बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न...आरडाओरड केल्याने धूम ठोकली!

बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न...आरडाओरड केल्याने धूम ठोकली!

Next

करमाळा तालुक्यात फुंदेवाडी, अंजनडोह व चिखलठाण येथे सहा दिवसात एकापाठोपाठ एक तीन जणावर हल्ला करून त्यांचे बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात विशेषत: नरभक्षक ज्या भागात चिखलठाण,वांगी, बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. भय इथले संपत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतातील कामे करण्यासाठी शेतकरी बाहेर पडत नाहीत. बाहेर गेलाच तर काठ्या, कुऱ्हाडी, भाले, जंबिया आदी हत्यारे घेऊन जात आहे तर फटाके फोडून आवाज करून बिबट्यापासून संरक्षण करीत आहेत.

चिखलठाण येथून निसटलेला बिबट्या शेटफळ-दहिगीव शिवारात असल्याच्या पाउलखुणा वन विभागाने पाहून बुधवारी दिवसभर शोध घेतला; पण बिबट्याची कोणतीच हालचाल दिसून आली नाही. वन विभागास नरसोबावाडी येथील माहिती समजल्यानंतर सांगवी नं.३ नरसोबावाडी शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आल्याने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याच्या हालचाली टिपण्यात आल्या. शिवाय डॉगस्कॉडच्या मदतीने शोध घेण्यात आला. बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसल्याने या परिसरात पिंजरे लावण्यात आली आहेत, पण बिबट्या दिसलाच नाही.

---------------गस्त वाढविली, पिंजरे लावले.

करमाळा तालुक्यात २०१८ मध्ये उंदरगाव येथे पकडला गेलेला बिबट्या प्राण्यावर हल्ला करीत होता. हा बिबट्या नरभक्षक असून, तो माणसाचे रक्त व मांसाला चटावलेला आहे. त्याला जिवंत अथवा ठार मारण्यासाठी दोन शार्पशूटर व तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. गस्त वाढवलेली असून, पिंजरे लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती उप-वनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली.

------

पालकमंत्री भेट देणार..

नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या अंजनडोह येथील जयश्री शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे अंजनडोह येथे शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता भेट देणार. त्यानंतर अंजनडोह येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गावकऱ्यांशी चर्चा व अधिकाऱ्याबरोबर बैठक घेणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित राहणार आहेत.

----

फोटो: १०करमाळाझ

फोटो ओळी: १ नरसोबावाडी शिवारात बिबट्याच्या शोधासाठी डॉग स्कॉडच्या सहाय्याने शोधकार्य करताना वन विभागाचे शिपाई.

२ नरसोबावाडी येथे बिबट्याच्या शोधासाठी आलेला वन विभागाच्या पथकाच्या गाड्यांचा ताफा व ग्रामस्थ.

३ -बिबट्यावर निरक्षण करण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यात येत आहे.

Web Title: Attempt to attack a leopard ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.