मोक्कातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास पोलीस जाताच पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:15+5:302021-07-14T04:26:15+5:30

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रियाज शेख यांनी तक्रार देताच भादंवि ३५३,३०९, २२५ अन्वये गुन्हा नोंदला आहे. कालिंदा ...

Attempt to commit suicide by pouring petrol as soon as police go to arrest suspects in Mocca! | मोक्कातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास पोलीस जाताच पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

मोक्कातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यास पोलीस जाताच पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न !

Next

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार रियाज शेख यांनी तक्रार देताच भादंवि ३५३,३०९, २२५ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

कालिंदा राजकुमार काळे (रा . कोरफळे), आशाबाई पंप्या शिंदे (रा. लाडोळे) आनंद्या राजअसून ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता घडली.

वरिष्ठांच्या आदेशानुसार वैराग पोलिसांत दाखल झालेल्या मोक्का गुन्ह्यातील संशयित आरोपी कोरफळे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच पोलीस राजेंद्र मंगरुळे, केसरे, देवकर, मेहेर व चव्हाण यांचे पथक तेथे गेले. त्याच्या घरासमोर आनंद्या काळे व राजकुमार रामराया काळे बसले होते. त्यांनी तालुका पोलिसांस पाहताच आनंद्या काळे याने घरातील पाच लिटर भरून ठेवलेला पेट्रोल कॅन अंगावर ओतून घेतले. हातात काडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचवेळी आशाबाई शिंदे, काविंदा काळे यांनी पोलिसांना अडथळा करून गोंधळ घातला व आनंद्या काळे यास पळून जाण्यास मदत केली.

ही माहिती पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे याना कळविताच त्यांनी आणखी पोलीस पथक पाठवले. त्यांनी राजकुमार रामराव काळे (रा.कोरफळे) यास अटक केली. तर शासकीय कामात अडथळा आणल्याने काविंदा राजकुमार काळे (रा.कोरफळे) व आशाबाई उर्फ पँपी शिंदे (रा. लाडोळे) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदला. यातील राजकुमार चव्हाण यास पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या ताब्यात दिले.

Web Title: Attempt to commit suicide by pouring petrol as soon as police go to arrest suspects in Mocca!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.