सोलापुरात बनावट दस्ताद्वारे प्रापर्टी स्वत:च्या नावावर लावण्याचा प्रयत्न

By विलास जळकोटकर | Published: December 8, 2023 05:11 PM2023-12-08T17:11:17+5:302023-12-08T17:12:17+5:30

जागामालकासह शासनाच्या फसवणुकीदबद्दल गुन्हा दाखल.

Attempt to transfer property in own name through forged deed in Solapur | सोलापुरात बनावट दस्ताद्वारे प्रापर्टी स्वत:च्या नावावर लावण्याचा प्रयत्न

सोलापुरात बनावट दस्ताद्वारे प्रापर्टी स्वत:च्या नावावर लावण्याचा प्रयत्न

विलास जळकोटकर,सोलापूर : बनावट खरेदीदस्ताद्वारे दुसऱ्या्या प्रॉपर्टीवर स्वत:चे नाव लावून जागा मालकासह शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी महम्मद सलीम अ. करीम कल्याणी (रा. १५० बेगम पेठ, सोलापूर) या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाण्यात नोंदला आहे. या प्रकरणी जागामालक अंबादास व्यंकटेश चव्हाण (वय- ६२, म्युन्सिपल कॉलनी, रेल्वेलाईन सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ फेब्रुवारी २०२० ते आजतागायत दुय्यम निबंधक कार्यालय, तलाठी उत्तर सोलापूर) येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी अंबादास व्यंकटेश चव्हाण यांच्या मालकीचा मजरेवाडी येथील अंत्रोळीकर नगर भाग-२ मधील प्लॉट नं ६४, यासी जुना सन २७१/१ व २७३/२ यासी नवीन सर्व्हे नं १७/२ या मिळकतीसंबंधी महम्मद सलीम अ.करीम कल्याणी यांच्याशी कोणताही व्यवहार केलेला नव्हता, असे अंबादास चव्हाण यांनी सदर बझार पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

अंबादास चव्हाण यांनी कोणताही व्यवहार केलेला नसताना, १६ फेब्रुवारी २००० रोजीचे खरेदी दस्त नं ७३४ हा लिहून दिलेला नाही. वास्तविक खरेदी दस्त हा सलगरवाडी येथील खुल्या जागेचे संदर्भात असल्याची दुय्यम निंबधक कार्यालय येथील अभिलेखावर नोंद आहे. असे असतानाही खरेदीखत लिहून देणार म्हणून असलेली व्यक्ती फिर्यादी नसताना या दस्तावर फिर्यादीची खोटी सही करून खरेदी घेणार म्हणून आरोपी व सह साक्षीदारांनी संगनमत करून फिर्यादीचे मालकीची शहर सोलापूर पैकी अंत्रोळीकर नगर भाग-२ मधील प्लॉट नं ६४, यासी जुना सन २७१/१ व २७३/२ यासी नवीन सर्व्हे नं १७/२ या मिळकतीसंबंधी खोटा दस्त बनवून फसवणूक केल्याचे चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यानुसार महम्मद सलीम अ.करीम कल्याणी (रा-१५० बेगम पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलिसात गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षीरसागरकरीत आहेत.

Web Title: Attempt to transfer property in own name through forged deed in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.