जागेच्या वाटणीकरुन खुनाचा प्रयत्न, करणाऱ्या चौघांना पाच वर्षे सक्तमजुरी
By विलास जळकोटकर | Published: May 15, 2024 08:10 PM2024-05-15T20:10:02+5:302024-05-15T20:10:47+5:30
जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली.
सोलापूर : जागेच्या वाटणीवरुन तरुणाचा तलवारीने खुनी हल्ला करण्याचा प्रयतत्न करणाऱ्या चौघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षाची सक्तमजयुरीची शिक्षा ठोठावली. जखमी फिर्यादी बंदगी हुसेनबाशा सिंगीकर (वय- ३५, बसवेश्वर नगर, नई जिंदगी, सोलापूर) यास एक लाख रुपये नुकसान भरपाईचा आदेश बजावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांच्या समोर या खटल्याची सुनावणी झाली.
जहाँगीर लालसाब सिंगीकर (वय- ५४), अबतलाह जहाँगीर सिंदगीकर (वय- २५), जैद जहाँगीर सिंदगीकर (वय- २९), अबुबखर जहाँगीर सिंदगीकर (वय- २७, सर्व रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर ) अशी शिक्षा सुनावलेल्या चौघा पिता पूत्रांची नावे आहेत.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे १३ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी चारच्या सुमारास सिद्धेश्वर पेठेत आरोपीच्या घरी गेले असता त्यांच्या सोबत त्यांचे अन्य नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेसाठी गेले होते. चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघून गेले. फिर्यादीचे काका लतिफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याचा दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलग हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. १ जहांगीर याने फिर्यादीला उद्देशून ‘इसकोच खतम करो, येच मेन काटा है.’ असे म्हणाल्याने सर्वांनी फिर्यादीला पकडून तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने खुनी हल्ला केला. कटावणी, लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले. फिर्यादीचा भाचा महिबूब बागवान हा अडवण्यासाठी मध्ये आला असता त्याच्यावरही तलवारीने हल्ला केला. या प्रकरणी जखमीच्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नमूद चौघांविरुध्द गुन्हा नोंदला होता. तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणात सरकार जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह राजपूत यांनी मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. एम. ए. इनामदार तर आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.या प्रकरणाचा तपास फौजदार अश्विनी काळे यांनी कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले.
आठ साक्षीदार तपासले
सदर प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिलांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. त्यात दोन जखमी नेत्र साक्षीदार,पंच, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.
सरकार पक्षाचा युक्तीवाद..
जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी युक्तीवादात दोन्ही जखमींच्या कपडयांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला. सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून-बूजून फिर्यादीला व त्यांच्या नातेवाईकांना ठार मारण्याच्या उद्देशानेच केला होता. घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. १ जहांगीर याने फिर्यादीला उद्देशून‘इसकोच खतम करो, येच मेन काटा है.’ असे म्हणून इतर सहआरोपींना गून्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
न्यायाधीशांनी सुनावली शिक्षा
दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे सर्व आरोपींना भा.दं. वि. कलम ३०७ अन्वये पाच वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व १ हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३० दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ३२३ अन्वये सहा महिने व ५०० रुपये दंड आणि तो न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच कलम ५०६ अन्वये सहा महिने ५०० रु. दंड सुनावला. यातील फिर्यादीला व जखमी यांना चारही आरोपींनी प्रत्येकी रक्कम १५ हजार रुपये अशी एकूण रक्कम १ लाख २० हजार एवढी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.