सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:07+5:302021-05-08T04:23:07+5:30
बार्शीत आमदार तानाजी सावंत यांनी सुरू केलेल्या एक हजार बेडच्या कोविड केअर सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ...
बार्शीत आमदार तानाजी सावंत यांनी सुरू केलेल्या एक हजार बेडच्या कोविड केअर सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री दिलीप सोपल आदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही समाजाच्या सोबत आहोत. कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा आहे. हा निकाल आला असला तरी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहाणार आहे. राज्य आणि केंद्र असा दुजाभाव न करता यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.
बार्शी नगरपालिकेसाठी दोन टन क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी तात्काळ देण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार तानाजी सावंत हेदेखील स्वखर्चातून दोन टन क्षमतेचा ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारणार आहेत.