परिचारक राहिले बाजूला; काळे, भालकेंवर वाॅच ठेवण्यातच कार्यकर्त्यांना रस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:47+5:302021-09-13T04:21:47+5:30
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात काळे बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम ...
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळाव्यात काळे बोलत होते. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, विजय देशमुख, नागेश फाटे, चंद्रकांत बागल, सुभाष पाटील, संदीप मांडवे, सुग्रीव कोळी उपस्थित होते. यावेळी आमदार दीपक साळुंखे म्हणाले, जी मंडळी प्रामाणिकपणाने काम करणार आहेत, त्यांनाच कमिटीवर संधी दिली जाईल. संघटनेची मूठ बांधायची आहे. आपलेच कार्यकर्ते कट्ट्यावर बसून आपल्याच कारखान्यांची चर्चा करतात, अशी खंत माजी आमदार दीपक साळुंखे यांनी व्यक्त केली.
................
दीपक आबांचा फोन सुरुच
दीपक आबांचा फोन सुरूच; आता मात्र अवघड. कल्याणराव काळे व भगीरथ भालके हे काय करतात, यावर खूप लक्ष आहे. आमच्यावर लय सीसीटीव्ही चालू आहेत. तुमचापण फोन सुरू आहे. आता मात्र अवघड झाले, असे कल्याणराव काळे सभेदरम्यान माजी आमदार दीपक साळुंखे यांना म्हणाले.
...........
पक्षविरोधी काम करणार्यांवर कारवाई होणार
विधानसभा पोटनिवडणुकीत कोणी-कोणी पक्षविरोधी काम केले आहे, त्याचा अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठविला असून ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केले, त्यांच्यावर कारवाई होईल, असे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सांगितले.