अकलूजच्या दूषित पाणीपुरवठ्याकडे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:27 AM2021-08-18T04:27:51+5:302021-08-18T04:27:51+5:30
श्रीपूर : तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना अकलूज नगरपरिषदेत कायम कर्मचारी म्हणून ...
श्रीपूर : तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना अकलूज नगरपरिषदेत कायम कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी लक्षवेधी सेनेने धरणे आंदोलन केले. अकलूजमधील जनतेला करण्यात येणारा दूषित पाणीपुरवठा बंद करून त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे, प्रदेशाध्यक्ष अमित भिंगारदिवे, लक्षवेधी सेनेचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह कांबळे, बहुजन युवा ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे सहभागी होते. बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष उदय कांबळे यांनाही लेखी पत्र दिले.
याप्रसंगी किरण साठे, अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बबन खंडागळे, समता परिषदेचे पिंटू एकतपुरे, मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे, बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ, रणजित कोळेकर, महेश देवकते यांनी पाठिंबा दिला.
---
फोटो : १७ अकलूज
अकलूजमध्ये बहुजन ब्रिगेडने धरणे आंदोलन केले. यावेळी अनिल साठे, अमित भिंगारदिवे, धवलसिंह कांबळे, उदय कांबळे आदी उपस्थित होते.
---
पाणी शुद्ध करुनच पुरवठा
पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या साठवण तलावात लाल मिश्रित पाणी असल्याने ते पाणी शुद्ध करूनच पाणी पुरवठा केला जात आहे, पाणी स्थिर झाल्यानंतर शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल असे लेखी पत्र देऊन कळविण्यात आले आहे. पाणीपुरवठा विभागाचे नंदकुमार जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्ते यांना पत्र दिल्यानंतर आंदोलन रद्द करण्यात आले.