सरपंचपदाच्या निवडीकडे गावकऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:23 AM2021-02-16T04:23:21+5:302021-02-16T04:23:21+5:30
गावकडचे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी कुर्डूवाडी : तालुक्यातील गावांतील रस्त्यावरची खडी उखडली आहे. वारंवार मागण्या करूनही याबद्दल संबंधित विभागाकडून ...
गावकडचे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
कुर्डूवाडी : तालुक्यातील गावांतील रस्त्यावरची खडी उखडली आहे. वारंवार मागण्या करूनही याबद्दल संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे दुचाकी वाहने खिळखळी होत आहेत. एस. टी. बसही अनेकदा नादुरुस्त होऊन मध्येच बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. आता शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसू लागला आहे. तातडीने दखल घेण्याची मागणी होऊ लागली आहे.
सर्दी, खोकल्यामुळे नागरिक हैराण
सोलापूर: गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण भागात सर्दी, खोकल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गावोगावच्या सरकारी, खासगी दवाखान्यात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याचा लहान मुले आणि वृद्धांना अधिक फटका बसू लागला आहे. सरकारी दवाखान्यातील औषधांचा साठा वाढवावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
ज्वारीच्या काढणीला वेग ; मजुरी वाढली
करमाळा : तालुक्यासह अन्यत्र रबी ज्वारीच्या काढणीला वेग आला आहे. भलगडी दादाचा सूर घुमू लागला आहे. मजुरी वाढल्याने शेतकऱ्यांनी घरच्या घरी काढणीवर भर दिला आहे. महिलांना २५० तर पुरुषांना ३०० ते ३५० मजुरी मिळत आहे. शिवाय एकरी एक पोते असाही दर सुरू आहे. जास्त क्षेत्र असणारे शेतकरी गुत्ते पद्धतीने ज्वारी काढून घेत आहेत.
अक्कलकोटमध्ये धुळीचे साम्राज्य
अक्कलकोट : स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये धुळीचे साम्राज्य पसरल्यामुळे लोकांना नाक बंद करुन ये- जा करावी लागत आहे. परगावाहून स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आता वाढू लागली आहे. शहरात प्रवेश करताच धुळीनेच त्यांचे स्वागत होते. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
-----