अनगरसिद्ध महाराजांच्या मंदिरात १११ किलो फुलांची आकर्षक सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:43+5:302021-08-24T04:26:43+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असतानाही सर्व नियम पाळून ही सजावट येथील सोन्याचांदीचे व्यापारी संदीप नकाते यांनी स्वखर्चातून केली. ...

Attractive decoration of 111 kg flowers in the temple of Angarsiddha Maharaj | अनगरसिद्ध महाराजांच्या मंदिरात १११ किलो फुलांची आकर्षक सजावट

अनगरसिद्ध महाराजांच्या मंदिरात १११ किलो फुलांची आकर्षक सजावट

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असतानाही सर्व नियम पाळून ही सजावट येथील सोन्याचांदीचे व्यापारी संदीप नकाते यांनी स्वखर्चातून केली. त्यामध्ये झेंडू, शेवंती,चमेली, गुलाब आदी फुलांचा वापर करण्यात आला. मुख्य दरवाजापासून ‘श्रीं’च्या गाभाऱ्यापर्यंत तिरंगा रंगातील आकर्षक फुलांची सजावट केली. सजावटीसाठी अनगरसिद्ध महिला मंडळांबरोबरच पुजारी भरत उमाकांत गुरव, नाना विलास गुरव, किरण गुंड, केदार नकाते, पवन नकाते, जितेश माने, दीपक लोंढे (सर), श्रीराम नरखेडकर, प्रतीक नकाते, महेश गुरव, बालाजी वाघमारे आदींनी मदत केली. माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. राजश्री राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

----

ओळी :

अनगर येथील ग्रामदैवत श्री अनगरसिद्ध महाराजांच्या मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

230821\img-20210823-wa0073.jpg

अनगर येथील ग्रामदैवत श्री अनगरसिध्द महाराजांच्या मंदिरात माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली श्रावण महीन्या निमित्त आज सलग तिसऱ्या सोमवारी एक क्विंटल ११ किलो वजनाच्या विविध रंगांच्या फुलांची अनगरच्या अनगरसिध्द महाराज मंदिरातआकर्षक सजावट

Web Title: Attractive decoration of 111 kg flowers in the temple of Angarsiddha Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.