विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:15 IST2019-10-02T14:10:58+5:302019-10-02T14:15:22+5:30
अतुल भोसले हे दक्षिण कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवित आहेत.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा विधी व न्याय खात्याकडे ३० सप्टेंबर २०१९ रोजी दिला आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे दक्षिण कराड मधून विधानसभेची निवडणूक लढवत असल्याने त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक होईपर्यंत मंदिर समितीचे कामकाज मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे पाहणार आहेत. बुधवारी अतुल भोसले यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विधानसभेची उमेदवारी अर्ज विठ्ठलचरणी ठेऊन दर्शन घेतले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे कराड दक्षिण मधून विधानसभे चा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरणार आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवारी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी उमेदवारी अर्ज ठेवून विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला.