पुन्हा होणार लिलाव ४७ साठे, १२ लाख ब्रास वाळू :
By admin | Published: May 12, 2014 12:49 AM2014-05-12T00:49:23+5:302014-05-12T00:49:23+5:30
आजपासून सुरू होणार ई-निविदा प्रक्रिया
सोलापूर: जिल्ह्यातील ४७ वाळू साठ्यांचे लिलाव होणार असून, १२ लाख २० हजार ४२१ ब्रासची किंमत ८३ कोटी ४३ लाख २ हजार ८२४ रुपये ठरविण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६९ वाळू साठ्यांच्या लिलावाला पर्यावरण विभागाच्या मान्यतेने शासनाने परवानगी दिली होती. त्यापैकी ४७ साठ्यांची ई-टेंडर (निविदा)ची प्रक्रिया सोमवार, १२ मे पासून सुरू होणार आहे. सोमवारी आॅनलाईन नोंदणी सुरू होईल. नोंदणी केलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी १२ ते १७ मे या कालावधीत कार्यालयीन वेळेत निविदा आॅनलाईन जमा करता येतील. १९ मे रोजी निविदाधारकांना ई-आॅक्शन पद्धतीने संगणकीय प्रणालीमध्ये वेबसाईट खुली केली जाईल. २० मे रोजी सकाळी ८ ते सायं.५ पर्यंत ई-आॅक्शन आॅनलाईन सुरू राहणार असून, २१ मे रोजी ई-आॅक्शनचा अंतिम निर्णय होईल. भीमा नदीवरील देवीकवठा, म्हैसलगी, गुड्डेवाडी, आळगे, लवंगी, कुरघोट, कुसूर-सिद्धापूर, शेगाव दुमाला-गोपाळपूर-मुंढेवाडी, बाभुळगाव-मिटकलवाडी,बाभुळगाव-मिटकलवाडी येथील प्रत्येकी साठा क्रमांक १, २, व ३ तर भंडारकवठे,कारकल, अजनसोंड येथील प्रत्येकी साठा क्रमांक १,२,३ व ४, पोहोरगाव, तारापूर-चळे येथील प्रत्येकी साठा क्र-१,२,३,४ व ५, चांदज, सादेपूर, कुडल, हत्तरसंग, बोळकवठा येथील प्रत्येकी साठा क्र-१ व २, औज मं येथील साठा क्रमांक २,३ व ४, सांगवी-कोंढारपट्टा, करोळे-लवंग, कान्हापुरी-वाघोली,आलेगाव खुर्द, गारअकोले, शेवरे, माणवरील शेटफळ-ममदापूर, भोगावतीवरील देगाव वा., सीनावरील नरखेड-खरकटणे, म्हैसगाव, उंदरगाव-केवड,आळजापूर, तरटगाव, बिटरगाव श्री, निलज-बोरगाव, खडकी,निमगाव (ह), मिरगव्हाण, करंजे-भालेवाडी, बाळेवाडी, दिलमेश्वर, तिºहे, घाटणे-भोयरे, नीरावरील तिरवंडी येथील वाळू साठ्यांचे लिलाव होणार आहेत.
-------------------------------------------
चोराला धार्जिणी सरकारी यंत्रणा यापूर्वी झालेल्या वाळू साठ्यातून शासनाला ५० कोटींचा महसूल मिळाला आहे. लिलाव झालेली वाळू नियमाप्रमाणे विक्री होणारी वाळू महागडी तर चोरटी वाळू स्वस्त मिळत आहे. सरकारी यंत्रणा चोराला धार्जिणी असल्याने याही वेळी वाळू लिलावाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. सहा महिन्यांखाली निश्चित केलेला वाळू साठा आज जागेवर असेलच असे नाही.
-----------------------
४७ साठ्यांची १२ लाख २० हजार ४२१ ब्रास वाळू
वाळूची महसूल खात्याने ठरविलेली रक्कम ८३ कोटी ४३ लाख २ हजार ८२४ रुपये