औंदा ज्वारी, हरभरा बक्कळ पिकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:00+5:302021-02-05T06:43:00+5:30

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हटले जाते. त्यातही करमाळा, मंगळवेढा, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, हे तालुके ...

Aunda sorghum, a gram of buckwheat will ripen! | औंदा ज्वारी, हरभरा बक्कळ पिकणार!

औंदा ज्वारी, हरभरा बक्कळ पिकणार!

Next

सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचं कोठार म्हटले जाते. त्यातही करमाळा, मंगळवेढा, मोहोळ, माढा, अक्कलकोट, बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, हे तालुके प्रसिद्ध पांढऱ्याशुभ्र टपोऱ्या मालदांडी ज्वारीचे उत्पादन घेणारे तालुके आहेत. इतर तालुक्‍यांतही ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

करमाळा तालुक्‍यातून भीमा व सीना या प्रमुख नद्या वाहतात. नद्यांकाठचा शिवार काळ्या कसदार मातीचा आहे. काही ठिकाणी नदीकाठी जमिनीला धर नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारी हे प्रमुख पीक आहे. गत पावसाळ्याच्या उत्तरार्धात मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतातील तालीमध्ये मोठा पाणीसाठा झाला होता. सततच्या पावसाने जमिनीला लवकर वापसा न झाल्याने पेरा उशिरा झाला. त्यामुळे हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.

गेल्या पावसाळ्यात न भूतो न भविष्यति, असा पाऊस कोसळला आणि बारमाही कोरड्या असणाऱ्या नद्यांनाही महापूर आले.

----

हुरड्यातील कोवळ्या दाण्यांची पक्ष्यांना भुरळ

अकरा वर्षांनंतर मांगी मध्यम प्रकल्प व सीना-कोळगावचा प्रकल्प ओसंडून वाहिला. एरव्ही याच दिवसांत उणे पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात यंदा मात्र शंभर टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. कारण, गेल्या पावसाळ्याच्या शेवटी झालेली अतिवृष्टी. यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमाने वाढली आहेत. सध्या ज्वारीचे पीक हुरड्यात आहे. ज्वारीच्या कणसांवरील हुरड्यात आलेल्या ज्वारीच्या कोवळ्या दाण्यांवर पक्षी ताव मारत आहेत.

फोटो ओळी : ३१करमाळा-ज्वारी

करमाळा तालुक्यातील रोशेवाडी शिवारात आलेले बहारदार ज्वारीचे पीक.

Web Title: Aunda sorghum, a gram of buckwheat will ripen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.