औरंगाबाद, पुण्याच्या टीमचा विठ्ठल मंदिर विकासासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:34+5:302021-07-09T04:15:34+5:30

श्री विठ्ठल-रुक्मणी मंदिर समितीची व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची पंढरपुरातील भक्तनिवास मध्ये बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल ...

Aurangabad, Pune team submits Rs 40 crore plan for Vitthal temple development | औरंगाबाद, पुण्याच्या टीमचा विठ्ठल मंदिर विकासासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा सादर

औरंगाबाद, पुण्याच्या टीमचा विठ्ठल मंदिर विकासासाठी ४० कोटी रुपयांचा आराखडा सादर

Next

श्री विठ्ठल-रुक्मणी मंदिर समितीची व पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची पंढरपुरातील भक्तनिवास मध्ये बैठक झाली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह.भ.प. जवंजाळ महाराज, ॲड. माधवी निगडे, नगराध्यक्षा साधना भोसले, ह.भ.प. मोरे महाराज, ह.भ.प. भास्करगिरी महाराज, दिनेश कदम, शंकुतला नडगिरे,औरंगाबा पुरातत्त्व विभागातील आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे, राहुल देशपांडे, दिनेश पाटील, अश्विनी कुलकर्णी, पुणे येथील पुरातत्व विभागाचे संचालक विलास वाहने उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती व मंदिर अधिक काळ सुरक्षित राहावे या दृष्टीने संपूर्ण मंदिराचे स्कॅनिंग करण्यात आले होते. मंदिरातील अनावश्यक वायरिंग बदलणे, मंदिराला पुरातन रूप येईल असे दगड बसविणे, मूळ रूप प्राप्त करून घेणे, नामदेव पायरी सुशोभीकरण आदी कामे पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार करण्यात येणार आहेत. त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व नियमानुसार ४० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असल्याचे ह.भ.प. औसेकर महाराज यांनी सांगितले.

कोट :::::::::

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मूळ रूप प्राप्त होण्यासाठी विविध कामे केली जाणार आहे. वारकऱ्यांचे आराध्य दैवत अधिक सुंदर दिसावे या दृष्टीने काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून विठ्ठल मंदिराच्या विकास कामाबद्दल आराखडा सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे फार बदल केले जाणार आहे.

- ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर

सहअध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

------

फोटो : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची पाहणी करताना पुरातत्त्व विभागातील आर्किटेक प्रदीप देशपांडे, राहुल देशपांडे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पूदलवाड. (छायाचित्र : सचिन कांबळे)

-----

Web Title: Aurangabad, Pune team submits Rs 40 crore plan for Vitthal temple development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.