सांसाठी अधिकार्यांचे हात हलेनात सेतूमधील दाखले मिळेनात; उत्तर तहसीलच्या तपासणीचे धाडस कोण करणार?
By Admin | Published: May 6, 2014 06:51 PM2014-05-06T18:51:28+5:302014-05-07T00:31:29+5:30
फोटो- सेतु..
फोटो- सेतु..
सोलापूर :
दाखले मागणीसाठी खिडक्या-खिडक्यांवर गर्दी होत असताना विविध प्रकारच्या दाखल्यांवर सा करण्यासाठी अधिकार्यांचे हात काहीकेल्या हलेनात़ जिल्हाधिकारी कार्यालगतच्या सेतूमधील दाखल्यांवर मंगळवारीही कोणीच सा न केल्याने दाखले कधी मिळणार याचे उत्तर खिडक्यांवर मिळत नव्हते. उत्तर सोलापूर तहसीलदार व कार्यालयातील कर्मचार्यांना जाब विचारणाराच कोणी नसल्याने ही अवस्था निर्माण झाली आहे.
उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका तसेच सोलापूर शहरातील विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालगतच्या सेतूमध्ये झुंबड उडाली आहे. विविध खात्यांमधील भरती व शिक्षणासाठी आवश्यक असल्याने दाखल्यांसाठी अर्जांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु आलेल्या अर्जांची तपासणी करण्यासाठी तयार दाखले तपासणीसाठी कर्मचारीच नाहीत. तपासणी केलेल्या दाखल्यांवर सा करण्यासाठीही अधिकारी नाहीत. उत्पन्नाचे दाखले तीन दिवसांत मिळतील असे सेतूमधून दिलेल्या पावतीवर दिले असले तरी ३० एप्रिल रोजी दाखल केलेल्या दाखल्यांवर मंगळवारीही सा झाले नसल्याचे सांगण्यात आले. नॉन क्रिमिलियर, रहिवास व विविध प्रकारच्या जातीच्या दाखल्यांच्या ढिगार्याला तहसीलदारांनीही हात लावला नाही. दाखल्यांसाठी पावत्या घेऊन लोक सेतू, तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालयात दिवसभर चकरा मारत होते. परंतु सा कोण करणार?, कधी करणार?, याचे उत्तर कोणीच देत नव्हते. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात अधिकार्यांचे हात दाखल्यांवर सा करण्यासाठी हलेना झाले आहेत. त्याचा परिणाम दाखले न मिळण्यामध्ये होत आहे.
-------------
अधिकार्यांना आहे का वेळ?
जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी व प्रांताधिकार्यांना अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाची तपासणी करण्यास वेळ नाही. रेशन कार्ड, रस्त्याची मागणी, वीज मंडल उपकेंद्र जागा व अन्य कामांसाठीची प्रकरणे चार-चार महिन्यांपासून पेंडिंग आहेत. कोणीच कोणाच्या कामाचा आढावा घेत नसल्याने नागरिकांचा प्रशासनावरच रोष वाढत आहे.
---------
सेतूमधील दाखल्यांवर सा करण्याबाबत तहसीलदारांशी बोललो आहे. कर्मचारी नसतील तर उपलब्ध करुन दिले जातील. दाखले वेळेत मिळावेत यासाठीचे नियोजन केले जाईल.
विजयसिंह देशमुख
निवासी उपजिल्हाधिकारी