भीमा, सीना, माण नदीवरील वाहून जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न, बंधाºयांना बसणार स्वयंचलित दरवाजे, जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:12 AM2017-11-17T11:12:58+5:302017-11-17T11:16:05+5:30

जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

Automatic doors, sealed enclosures of Biman, Cena, Maan, water supply | भीमा, सीना, माण नदीवरील वाहून जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न, बंधाºयांना बसणार स्वयंचलित दरवाजे, जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

भीमा, सीना, माण नदीवरील वाहून जाणारे पाणी रोखण्याचा प्रयत्न, बंधाºयांना बसणार स्वयंचलित दरवाजे, जलसंपदामंत्र्यांची ग्वाही

googlenewsNext
ठळक मुद्देभीमेतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी वाचविण्यास मदतसोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पुण्यात बैठकजलसंपदा राज्यमंत्र्यांनी प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी काम करण्याचे आश्वासन दिले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १७  : जिल्ह्यातील भीमा, सीना आणि माण नदीच्या पात्रातील चार कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांवर प्रायोगिक तत्त्वांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येतील. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक लघू पाटबंधारे विभागाला सादर करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. हे काम झाल्यास भीमेतून वाहून जाणारे लाखो लिटर पाणी वाचविण्यास मदत होईल. कालव्यातून अर्धे आवर्तन वाचेल, असेही त्यांनी सांगितले. 
सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्नाबाबत जलसंपदा राज्यमंत्री शिवतारे यांनी पुण्यात बैठक घेतली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, लाभक्षेत्र प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळातच आम्ही बंधाºयांना स्वयंचलित दरवाजे बसविण्याची मागणी केली होती. तत्कालीन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी सर्वेक्षण करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. सरकार बदलले, विषय मागे पडत होता. पुन्हा पाठपुरावा सुरू  केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकारातून आजची बैठक झाली. जलसंपदा राज्यमंत्र्यांनी प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. पुणे जिल्ह्यातील दौंडजवळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयाचे बॅरेजेसमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. याचा अभ्यास करून अंदाजपत्रक मांडण्याची सूचना करण्यात आली. 
-------------------
यासाठी आवश्यक आहेत स्वयंचलित दरवाजे
- जिल्ह्यातील अनेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयांबाबत तक्रारी येतात. बंधाºयांना गळती लागलेली असते.  पाटबंधारे विभागाचे अधिकारी पावसाळ्यानंतर या बंधाºयांना वेळेवर दरवाजे लावून पाणी अडवित नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. कोल्हापूर बंधाºयांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यासाठी त्यांची रचना बदलावी लागते. स्वयंचलित दरवाजांमुळे गळती तर थांबतेच शिवाय भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी रोखण्यास मदत होईल. 
---------------
येथे होणार काम 
- पंढरपूर तालुक्यात पुळूज (भीमा नदी), सिद्धेवाडी (माण), माढा तालुक्यातील कव्हे आणि रिधोरे (सीना नदी).
-----------------
---------------------
कारंबा पंपगृहाचे काम तीन महिन्यात
- पालकमंत्री देशमुख यांच्या मागणीनुसार कारंबा येथील पंपगृहाच्या कामाची निविदा १५ दिवसात काढावी. तीन महिन्यात काम पूर्ण करू न सोलापूरला पाणी उपलब्ध करून द्यावे. टाकळी आणि वडकबाळ येथे रस्ता व बंधाºयाचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्याच्या सूचना केल्या. 

Web Title: Automatic doors, sealed enclosures of Biman, Cena, Maan, water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.