तेराव्याचा खर्च टाळून वृध्द, मुकबधिरांना अन्नदान
By admin | Published: September 11, 2016 05:49 PM2016-09-11T17:49:29+5:302016-09-11T17:49:29+5:30
पल्या वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधीलकी जोपासून वृध्दाश्रमातील वृध्दांना व मुकबधीर विद्यार्थ्यांना अन्नदान केले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर, दि. ११ - समाजातील प्रचलीत रुढी परंपरांना फाटा देत तालुक्यातील दस्तापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश मुंजे यांनी आपल्या वडिलांचा तेराव्याचा कार्यक्रम न करता सामाजिक बांधीलकी जोपासून वृध्दाश्रमातील वृध्दांना व मुकबधीर विद्यार्थ्यांना अन्नदान केले.
हिंदू संस्कृतीत व्यक्तीच्या निधनानंतर काही धार्मिक सोपस्कार पार पाडणे गरजेचे असल्याचे मानले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने दशकार्य, तेरवी किंवा वर्षश्राद्ध आदिंचा प्रामुख्याने समावेश आहे. प्रत्यक्षात वडील किंवा आई जिवंत असताना त्यांच्या आरोग्यावर, खाण्यापिण्यावर खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहणारे व्यक्ती त्यांच्या निधनानंतर मात्र तेराव्यासारख्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खर्च करतात; परंतु काही लोक याला अपवाद आहेत.
त्यामध्येच दस्तापूर येथील रमेश मुंजे यांचा समावेश करावा लागेल. रमेश मुंजे यांचे वडील वृद्धापकाळात आजारामुळे खाटेला खिळले असताना रमेश मुंजे यांनी त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्व उपचार करण्यावर खर्च केला; परंत त्यांचे वडील नामदेवराव मुंजे यांचे २८ आॅगस्ट रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले होते. त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरविण्यात आले होते; परंतु रमेश मुंजे यांनी वडिलांच्या तेरवीचा कार्यक्रम न करता शहरालगत असलेल्या तुळजापूर येथील चित्रऋषी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ वृध्द व मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नदान केले.
रमेश मुंजे यांनी वडिलांच्या तेरवीवर परंपरेनुसार खर्च न करता मूकबधिरांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, नगरसेवक अनिल गावंडे, शिवसेना शहर प्रमुख विवेक नाकाडे, किशोर कदम, रवि राऊत, सुरज बुरे, जुबेर मोहनावाले, सरपंच अविनाश आटपटकर,श्रीमंत खांडेकर, मुकेश मुंजे, प्रा.मनवर, पत्रकार प्रा.विरेंद्रसिंह ठाकुर, बालु काळे, राजेश दबडे, शिक्षक ए.बी.राठोड, यांचेसह आदिंची उपस्थिती होती.