आमदार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आवताडेंची कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:36 AM2021-05-05T04:36:54+5:302021-05-05T04:36:54+5:30

पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यांत सध्या अनेक नागरिकांना रुग्णालयात बेड मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. उपलब्ध असलेल्या कोविड सेंटरमध्ये जागा मिळणे ...

Avtade's work started on the second day after he became an MLA | आमदार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आवताडेंची कामाला सुरुवात

आमदार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आवताडेंची कामाला सुरुवात

Next

पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यांत सध्या अनेक नागरिकांना रुग्णालयात बेड मिळण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. उपलब्ध असलेल्या कोविड सेंटरमध्ये जागा मिळणे अवघड झाले आहे. पंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. शिवाय रेमडेसिविर इंजेक्शनबाबतही नागरिकांमध्ये अस्वस्थता दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून येणाऱ्या कालावधीत ही व्यवस्था बदलण्यासाठी आपले प्रमुख प्राधान्य असेल. याबाबत आज पंढरपूर प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे आ. प्रशांत परिचारक उपस्थित होते. आम्ही दोघे मिळून पंढरपूर, मंगळवेढ्यातील जनतेला जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे हार, तुरे, सत्कार कार्यक्रम घेण्यापेक्षा कोरोना संकट, पाणीप्रश्नासह इतर अडचणी सोडविण्याला आपले प्रथम प्राधान्य आहे. कमी वेळ व जादा आव्हाने असल्याने वेळेचे नियोजन करून वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार आहे. जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी आपला शंभर टक्के प्रयत्न असेल, असे नवनियुक्त आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.

फोटो लाइन :::::::::::::::::::

पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत असताना आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार सुशील बेल्हेकर आदी.

Web Title: Avtade's work started on the second day after he became an MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.