आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

By संताजी शिंदे | Published: June 9, 2023 02:53 PM2023-06-09T14:53:45+5:302023-06-09T14:53:45+5:30

यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

Awach Morcha: Akshay Bhalerao's killers must be hanged; Otherwise, you have to leave the pen and think twice | आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

googlenewsNext

सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा हेत्येच्या निषेधार्थ शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

            हातात निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी, आणि महिला व युवतींनी हातामध्ये फलक घेऊन हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला आणि या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातील सदस्यास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा. आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात यावा.

मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माईंड पर्यंत पोहोचण्याकरिताआरोपी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांचा सीडीआर तपासण्यात यावे. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास पन्नास लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व बौद्धांना शस्त्र परवाने देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी आतिश बनसोडे, उमेश काळे, सचिन वाघमारे, पिंटू डावरे, प्रवीण कांबळे,  रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, वैशाली उबाळे, साधना गायकवाड, अखिल शाक्य, दत्ता सिद्धगणेश, अण्णासाहेब वाघमारे, केरू जाधव, दिपक गवळी, प्रणव पात्रे, अमित गायकवाड, प्रवीण सुरवसे, विनोद जाधव, अविनाश आठवले, बाळासाहेब बनसोडे, विशाल चतुर, विशाखा उबाळे, सचिन कोलते, पंकज ढसाळ, सिद्धार्थ गुड्डे, राजरत्न कदम, उमेश काळे, प्रवीण सुरवसे यांच्यासह संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

Web Title: Awach Morcha: Akshay Bhalerao's killers must be hanged; Otherwise, you have to leave the pen and think twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.