आषाढी वारी चुकली म्हणून हसापुरात हरिनामाचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:39+5:302021-07-18T04:16:39+5:30
गुरव महाराज यांचे अख्खे कुटुंब दरवर्षी पंढरपूर वारीत सामील होत असे. यामुळे त्यांना मोठे मानसिक समाधान लाभत असे. अशाप्रकारे ...
गुरव महाराज यांचे अख्खे कुटुंब दरवर्षी पंढरपूर वारीत सामील होत असे. यामुळे त्यांना मोठे मानसिक समाधान लाभत असे. अशाप्रकारे सलग तीस वर्षे पायी वारी सुरू होती. दोन वर्षांपासून वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत धार्मिक कार्यक्रम करत राहावे, यामुळे मानसिक शांती, समाधान लाभते म्हणून स्वतःच्या शेतात एका पत्राशेडमध्ये सलग २१ दिवस अखंड हरिनामाचा गजर सुरू केला आहे. रोज शेकडो भाविक, भजन, दर्शनासाठी येत आहेत.
विठ्ठलाच्या प्रतिमेला रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी विधीवत पूजापाठ, सायंकाळी आरती, भजन केले जाते. यासाठी भीमाशंकर गुरव, विश्वनाथ गुरव, चंद्रशेखर गुरव, प्रवीण गुरव, गणेश पाटील, लक्ष्मण केंद्रे, श्रीमंत सुतार, आदींचा सहभाग आहे. चप्पळगाव, दहिटणे, भुरीकवटे, हसापूर, आदी गावचे भजन मंडळ आपली सेवा रुजू करीत आहेत. कार्यक्रमासाठी मुतणा गुरव, अर्जुन गुरव, श्रीदेवी स्वामी परिश्रम घेत आहेत.
----
मान्यवरांनी नोंदवला सहभाग
यंदा २ जुलै रोजी या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात कुरनूरचे ह.भ.प. आबा महाराज व ज्येष्ठ साहित्यिक हेरंबराज पाठक यांच्या हस्ते पूजापाठ करून झाली. १५ दिवसांत जमादार महाराज (अकलूज), हंचाटे महाराज (वागदरी, ता. अक्कलकोट), राजकुमार पाटील महाराज, महादेव बिराजदार महाराज (हाळ वागदरी, ता. तुळजापूर) यांच्यासह बाबूराव रामदे, धुळप्पा भजे, मल्लिनाथ स्वामी, विद्याधर गुरव, आदींनी भेट देऊन हरिनाम जागरामध्ये सहभाग नोंदवला.
----
फोटोओळ : १७अक्कलकोट
हसापूर (ता. अक्कलकोट) येथील शिवारात सलग एकवीस दिवस अखंड हरिनामाचा जागर सुरु आहे. यावेळई जप मौन व्रत करणारे ह.भ.प. काशीनाथ गुरव महाराज.