कोरोना मुक्तीसाठी करकंबकरांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:23 AM2021-04-09T04:23:56+5:302021-04-09T04:23:56+5:30
करकंब : 'माझे गाव, कोरोना मूक्त गाव', अभियानांतर्गत करकंब गावचे पालक अधिकारी तथा केंद्रप्रमुख आप्पा माळी ...
करकंब : 'माझे गाव, कोरोना मूक्त गाव', अभियानांतर्गत करकंब गावचे पालक अधिकारी तथा केंद्रप्रमुख आप्पा माळी यांनी ग्रामस्थांचे आणि गावातील व्यावसायिकांचे प्रबोधन केले.
शिक्षकांच्या इतर कर्मचाऱ्यांच्या जबाबदार्या त्यांनी समजावून सांगून त्याबाबत जनजागृती कशी करावी सूचनाही दिल्या.
करकंबचे पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी शासनाच्या निर्देशाबद्धल उपस्थितांना माहिती दिली. करकंबचे उपसरपंच आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मारूती देशमुख, प्रा. सतीश देशमुख, संतोष धोत्रे, बापू शिंदे, महेंद्र शिंदे, अड. शरद पांढरे, सचिन शिंदे गावातील किराणा दुकानदार यांनी दशसूत्री पाळावी याबद्धल माहिती दिली.
यावेळी ग्रामविकास आधिकारी के. एच. नवले, व्यापारी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतणीस उपस्थित होते.
----
०८ करकंब
करकंब येथे कोरोना पासून बचाव करण्याबाबत माहिती देताना पथक.