जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:27 AM2021-06-09T04:27:40+5:302021-06-09T04:27:40+5:30
----- जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने जलाभिषेक बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा राज्याभिषेक सोहळा जय शिवराय प्रतिष्ठानकडून अठरापगड ...
-----
जय शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने जलाभिषेक
बार्शी : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४७ वा राज्याभिषेक सोहळा जय शिवराय प्रतिष्ठानकडून अठरापगड जाती व बाराबलुतेदार मावळ्यांकडून नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक करून करण्यात आला. यावेळी भगव्या ध्वजाचे पूजन करून १०२१ लाडूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, माजी पंचायत समिती उपसभापती अविनाश मांजरे, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, आरोग्य सभापती संदेश काकडे, पाणीपुरवठा सभापती संतोष बारंगुळे, नगरसेवक मदन गव्हाणे, सभापती रोहित लाकाळ, नगरसेवक महेश जगताप, सचिन वायकुळे, गणेश घोलप, किरण गाढवे, रावसाहेब यादव, ऋषीकांत पाटील, महेश देशमुख, पांडुरंग फपाळ, बापू कदम, प्रशांत खराडे उपस्थित होते.
----
पंचायत समिती बार्शी
बार्शी पंचायत समिती येथे भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची पूजा करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, माजी उपसभापती अविनाश मांजरे व पंचायत समितीचे सर्व अधिकारी उपस्थित होते. जवाहर हॉस्पिटलच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
----
चपळगाव ग्रामपंचायत येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा
चपळगाव : अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव ग्रामपंचायतीकडून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील होते. याप्रसंगी ग्रामसेवक एस.बी. कोळी, सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, महेश पाटील, पोलीस पाटील चिदानंद हिरेमठ, ग्रा.प. सदस्य गणेश कोळी, महिबूब तांबोळी, विलास कांबळे, मल्लिनाथ सोनार, संजय वाले, विश्वजित कांबळे, स्वामीनाथ जाधव, परमेश्वर वाले, श्रावण गजधाने आदी उपस्थित होते.
-----
अन्नछत्र मंडळात शिवराज्याभिषेक
चपळगाव : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. तर श्री कमलाराजे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याबरोबरच अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. छत्रपतींच्या मूर्तीचे पूजन युवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशचंद्र सूर्यवंशी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहरप्रमुख योगेश पवार, मराठा सेवा संघाचे ता. अध्यक्ष प्रवीण घाटगे, शहराध्यक्ष मनोज गंगणे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्यामराव मोरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी संचालक प्रशांत भगरे, मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोटचे अध्यक्ष अरविंद पाटील, विश्वस्त संतोष भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मनोज निकम, पत्रकार प्रवीण देशमुख, प्रा. प्रकाश सुरवसे उपस्थित होते.
--------
फोटो : ०७ अक्कलकोट , ०७ बार्शी, ०७ चपळगाव