साेलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओंचा राष्ट्रपतींच्या हस्ते गाैरव, इंदाैरमध्ये वितरण
By राकेश कदम | Published: September 27, 2023 06:57 PM2023-09-27T18:57:07+5:302023-09-27T18:57:33+5:30
पश्चिम विभागातील उल्लेखनीय कामगिरीचा गाैरव
राकेश कदम
साेलापूर :राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी बुधवारी इंदाैर येथील स्मार्ट सिटी अवाॅर्ड काॅक्लेव्हमध्ये साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनी (स्मार्ट सिटी)च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शितल तेली उगले आणि अधिकाऱ्यांचा पुरस्कार देउन गाैरव केला.
स्मार्ट सिटी मिशनच्या वतीने इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्डचे आयाेजन करण्यात आले हाेते. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शहरांना पारितोषिक देउन गाैरविण्यात आले. देशाच्या पश्चिम विभागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी साेलापूर स्मार्ट सिटी कंपनीचा गाैरव केला.
यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, स्मार्ट सिटीचे कुणाल कुमार यांची प्रमुख उपस्थिती हाेती. सीईओ शितल तेली उगले, मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चाैबे, लेखाधिकारी मनीष कुलकर्णी, मनाेज नंदीमठ, उमर बागवान यांनी पारिताेषिक स्वीकारले.
पुरस्कारासाठी महत्त्वाच्या ठरल्या या बाबी
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरात पाणी नियोजनासाठी स्काडा प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागांचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्ते विकास, पाण्याच्या पाईपलाईन, सोमपा इंद्रभवन इमारत आणि लक्ष्मी मंडई येथील इमारत अशा पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे आदी कामांची दखल घेउन हा पुरस्कार मिळाल्याचा दावा व्यंकटेश चाैबे यांनी केला.