महाळुंगमध्ये कोरोनाविषयी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:54+5:302021-03-19T04:20:54+5:30
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे बुधवारी झालेल्या आठवडी बाजारात सायंकाळी कारोनाविषयक जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क वापरा, सोशल ...
श्रीपूर : माळशिरस तालुक्यात महाळुंग येथे बुधवारी झालेल्या आठवडी बाजारात सायंकाळी कारोनाविषयक जनजागृती करण्यात आली. नागरिकांना मास्क
वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, लक्षणे जाणवल्यास तपासणी करून घ्या,
बाधित असाल, तर आपले विलगीकरण करून घ्या, अशा जनजागृतीपर सूचना माळशिरस पंचायत समितीच्या शिक्षण विभाग महाळुंग
केंद्राच्या वतीने करण्यात आल्या.
कोरोनाविषयक आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत
व्यापारी, नागरिकांनी प्रतिसाद नोंदविला. विजेत्यांना
मास्क व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना गांधीगिरीच्या मार्गाने गुलाबपुष्प व मास्क देऊन जनजागृती करण्यात आली.
माळशिरस येथील पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने कौन बनेगा कोरोना फायटर, चालता बोलता प्रश्नमंजूषा कार्यक्रम, पोस्टर
स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, पथनाट्य, लस घेतलेल्या व्यक्तींची मुलाखत, असे
विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्ताराधिकारी महालिंग नकाते, रामकृष्ण गुरवसर,
राजाराम गुजर, सुहास उरवणे, पांडुरंग मोहिते, प्रदीप कनाळ, समीर लोणकर,
प्रेमनाथ रामदासी, मारुती जाधव, महाळुंगचे केंद्रीय
मुख्याध्यापक रमेश बळकट यांनी जनजागृती केली.
----
१८ श्रीपूर
महाळुंगमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करताना पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी.