बीबीदारफळमध्ये करताहेत त्या कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:12+5:302021-05-12T04:22:12+5:30
बीबीदारफळ-सावंतवाडी व लोकमंगल साखर कारखाना अशी विस्तीर्ण पसरलेली लोकवस्ती. दर आठवड्याचे नियमित सुरू असलेले लसीकरणाचे कामही आठ हजार लोकसंख्येच्या ...
बीबीदारफळ-सावंतवाडी व लोकमंगल साखर कारखाना अशी विस्तीर्ण पसरलेली लोकवस्ती. दर आठवड्याचे नियमित सुरू असलेले लसीकरणाचे कामही आठ हजार लोकसंख्येच्या गावात अधिक आहे. त्यातच मार्च- एप्रिल महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव बीबीदारफळ-सावंतवाडीत वाढला आहे. मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, अंतर ठेवा असा घरोघरी प्रचार करण्याचे काम आरोग्य सेविका सुलोचना हुडकर यांनी मागील वर्षभर केले आहे. तर वर्षभरात गावात ३० कॅम्पमधून ९४१ टेस्टिंग केले आहे.
---
भेदरलेल्या लोेकांना धीर
बीबीदारफळ आरोग्य उपकेंद्रासाठी डाॅ. पूजा खराडे या रुग्णांची सेवा प्रामाणिकपणे बजावत आहेत. गावातील सर्वसामान्य व्यक्तीनेही कोरोना तपासणी करण्यासाठी फोन केला तरी रॅपीड टेस्ट होतेच. कोरोनामुळे भेदरलेल्या लोकांना डाॅ. खराडे, आरोग्य सेविका हुडकर व आशा सेविकेंचा मोठा धीर मिळत आहे.
---
फोटो - ११ बीबीदारफळ