गुळसडीत पत्रके वाटून, पोस्टर चिकटवून शिक्षिकांकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:46+5:302021-03-28T04:21:46+5:30
करमाळा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा तालुक्यात विविध माध्यमांच्या मदतीने जनजागृती सुरू आहे. तालुक्यात गुळसडी (ता. करमाळा) जिल्हा ...
करमाळा : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळा तालुक्यात विविध माध्यमांच्या मदतीने जनजागृती सुरू आहे. तालुक्यात गुळसडी (ता. करमाळा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकांनी गावामध्ये पत्रके वाटून, पोस्टर चिकटवून कोरोनाविषयक जनजागृती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सूचनानंतर परिषदेचे कर्मचारी कोरोना संदर्भात जागृती करत आहेत. गुळसडी शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत, सहशिक्षिका मंजुषा आव्हाड, संगीता बीडगर यांनी गावात कोरोना जनजागृती केली आहे. यावेळी त्यांनी माझे गाव कोरोनामुक्त गाव, माझे दुकान माझी जबाबदारी या अनुषंगाने प्रबोधनात्मक उपक्रम राबविले.
गावातील दुकानदार, पीठ गिरणी चालक, भाजी विक्रेते यांच्यासह सर्वसामान्यांमध्ये कोरोना लसीकरणाबाबत शिक्षिकांकडून जनजागृती केली गेली. या उपक्रमाचे सरपंच संजीवनी यादव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महावीर कळसे तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.
----
२७ करमाळा
गुळसडी प्राथमिक शाळेतील शिक्षिका गावात कोरोन जनजागृती फेरी मारुन नागरिकांना माहिती देत आहेत.