पथनाट्य, वासुदेव फेरी, होम मिनिस्टर स्पर्धेद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:38 AM2021-02-18T04:38:43+5:302021-02-18T04:38:43+5:30
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नगरपालिकांमध्ये स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन याबाबत चांगली कामगिरी करून आपल्या शहराचे मानांकन अव्वल आणण्यासाठी दरवर्षी ...
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील नगरपालिकांमध्ये स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन याबाबत चांगली कामगिरी करून आपल्या शहराचे मानांकन अव्वल आणण्यासाठी दरवर्षी चढाओढ पहावयास मिळते.
याप्रमाणे पर्यावरण संवर्धनासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी संघटित प्रयत्न करावेत, या उद्देशाने पाच प्रमुख घटकांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्य सरकारमार्फत राबविले जात आहे.
स्वच्छता राखणे, कचरा वर्गीकरण, होम कंपोस्टिंग करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे, पाण्याची बचत करणे, वृक्ष लागवड करणे, ऊर्जास्रोतांची बचत करणे, प्रदूषण रोखणे या गोष्टी साध्य करण्यासाठी नागरिकांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण होणे ही काळाची गरज आहे. यासाठीच जनजागृती महिना राबविला जाणार आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, आरोग्य सभापती रफिक तांबोळी, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::
या जनजागृती महिन्यात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांपासून प्रेरणा घेऊन शहरातील नागरिकांनी स्वतःमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करावी. त्याप्रमाणे कृती केल्यास या दोन्ही अभियानांना लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊन अभियानाची उद्दिष्टे साध्य होतील.
- कैलास केंद्रे
मुख्याधिकारी
कोट ::::::::::::::::::::
शहरास स्वच्छ, सुंदर, हरित बनविण्यासाठी नगरपालिकेच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळण्यासाठी हा जनजागृती महिना उपयुक्त ठरेल.
- राणी माने, नगराध्यक्षा