संकटकाळातील मदतीबाबत खेडमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:25 AM2021-09-26T04:25:13+5:302021-09-26T04:25:13+5:30
मार्डी : ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने खेड येथे उत्तर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ...
मार्डी : ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने खेड येथे उत्तर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची ग्रामसुरक्षा यंत्रणेसंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत संकटकाळातील मदतीबाबत खेडमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणेचे प्रबोधन संचालक डी. के. गोरडे यांनी केले.
या यंत्रणेविषयी माहिती देताना संकटकाळातील व्यक्तीने ग्रामसुरक्षा यंत्रणेला एक कॉल केल्यास गावातील हजारो जणांना हा कॉल जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संकटग्रस्त काळात तत्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे. आत्तापर्यंत ३५०० गावे, २५० पोलीस स्टेशन, १५० सरकारी कार्यालये, २० लाख नागरिक, पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, अहमदनगर जिल्हा या यंत्रणेत सहभागी झाले आहेत. यावेळी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण घुगे, उत्तर तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रवीण देशमुख उपस्थित होते.
फोटो : २५ मार्डी
ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत मार्गदर्शन करताना संचालक डी. के. गोरडे. समवेत पोलीस निरीक्षक अरुण फुगे आणि पोलीस कर्मचारी, अधिकारी.