कुर्डूृवाडीत रेल्वे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची आ़ बबनराव शिंदे यांची मागणी, शरद पवार यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांना भेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 03:06 PM2018-02-23T15:06:25+5:302018-02-23T15:08:45+5:30

कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला आवश्यक ते काम मिळावे, विस्तारीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध व्हावा व मुख्य म्हणजे येथे मालवाहतूक डब्याचा कारखाना असून येथे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना व्हावा या मागणीसाठी आ. बबनदादा शिंदे हे शिष्टमंडळासह खा.शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Babanrao Shinde's demand for introduction of Railway Passenger Coach Factory in Kurdutiwadi, Sharad Pawar's intervention will meet Railway Ministers | कुर्डूृवाडीत रेल्वे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची आ़ बबनराव शिंदे यांची मागणी, शरद पवार यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांना भेटणार

कुर्डूृवाडीत रेल्वे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची आ़ बबनराव शिंदे यांची मागणी, शरद पवार यांच्या मध्यस्थीने रेल्वे मंत्र्यांना भेटणार

Next
ठळक मुद्देपरेल येथील रेल्वेचा कोच कारखाना बंद करण्यात आला आहे़ त्याचा पूर्णपणे वर्कलोड कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला द्यावा जेणेकरुन कुर्डूवाडी शहराच्या वैभवात भर पडेल.कुर्डूवाडी शहरात रेल्वेची सुमारे ११५ एकर जागा आहे व आरपीएफ ट्रेनिंग सेंटर चिंकहील हे बंद झाले असून त्याचीही ११० एकर जागा आहेकुर्डूवाडी येथे कोच बनविण्याच्या कारखान्याची मागणी असताना देखील लातूर येथे नवीन कारखाना काढण्यात आल्याने कुर्डूवाडीकरांवर अन्याय झाला असल्याची खंत ही आ.शिंदे यांनी बोलून दाखवली


आॅनलाइन लोकमत सोलापूर
कुर्डूवाडी दि २३  : कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला आवश्यक ते काम मिळावे, विस्तारीकरणासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध व्हावा व मुख्य म्हणजे येथे मालवाहतूक डब्याचा कारखाना असून येथे प्रवासी कोच बनविण्याचा कारखाना व्हावा या मागणीसाठी आ. बबनदादा शिंदे हे शिष्टमंडळासह खा.शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    विठ्ठलराव शिंदे सह.साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, परेल येथील रेल्वेचा कोच कारखाना बंद करण्यात आला आहे़ त्याचा पूर्णपणे वर्कलोड कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याला द्यावा जेणेकरुन कुर्डूवाडी शहराच्या वैभवात भर पडेल, येथे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.  कुर्डूवाडी शहरात रेल्वेची सुमारे ११५ एकर जागा आहे व आरपीएफ ट्रेनिंग सेंटर चिंकहील हे बंद झाले असून त्याचीही ११० एकर जागा आहे.  अद्ययावत रेल्वे हॉस्पिटल, रेल्वे शाळा, मुबलक पाणी, विजेची सोय, कर्मचाºयांना राहण्यासाठी घरे अशा विविध सुविधा येथे उपलब्ध आहेत.
    कुर्डूवाडी हे रेल्वे जंक्शनचे ठिकाण असून मिरज-लातूर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-चेन्नई यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे़ त्यामुळे येथे दळणवळणाच्या सोयी उपलब्ध आहेत़ कुशल कामगार वर्ग येथे उपलब्ध आहे़ शहरापेक्षा कमी मजुरीत मजूर उपलब्ध होऊ शकतात़ यामुळे प्रवासी डब्यांची प्रोडक्शन कॉस्ट मुबलक कमी होऊ शकते़ निधी उपलब्ध नसल्यामुळे आपण खा. शरद पवार यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्री व रेल्वे बोर्ड यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे आ.शिंदे यांनी सांगितले.
----------------------------
लातूरच्या कारखान्याला विरोध नाही 
- कुर्डूवाडी येथे कोच बनविण्याच्या कारखान्याची मागणी असताना देखील लातूर येथे नवीन कारखाना काढण्यात आल्याने कुर्डूवाडीकरांवर अन्याय झाला असल्याची खंत ही आ.शिंदे यांनी बोलून दाखवली.  लातूर येथील कारखान्याला आमचा विरोध नाही; मात्र आमची मागणीही जुनी असून आमच्यावर अन्याय होत असल्याचेही आ़ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविले.

Web Title: Babanrao Shinde's demand for introduction of Railway Passenger Coach Factory in Kurdutiwadi, Sharad Pawar's intervention will meet Railway Ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.