बाबासाहेबांनी पुस्तकांनाही भाकरीएवढेच महत्त्व दिले : देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:30+5:302020-12-07T04:16:30+5:30
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे महापुरुषांची विचारधारा राष्ट्रीय ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. ...
अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र विभागातर्फे महापुरुषांची विचारधारा राष्ट्रीय ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले शिक्षण, त्यातून मिळालेली विद्वत्ता त्यांनी आपल्या देशासाठी, समाजासाठी वापरली. म्हणून त्यांना जग महामानव म्हणते. केवळ घटना परिषद किंवा मसुदा समितीत काम केले असे नाही तर सामाजिक जीवनातील हजारो प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. गर्भवती महिलांना रजा, कामगारांच्या कामाचे ८ तास या गोष्टी बाबासाहेबांनी सुरू करण्याचा आग्रह धरला असल्याचे डॉ. आबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
या व्याख्यानासाठी सिंहगड इन्स्टिट्युटचे प्राचार्य शंकर नवले, डॉ. सिद्राम सलवदे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक डॉ. केशव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विश्वनाथ आवड यांनी केले तर प्रा. दादासाहेब कोकाटे यांनी आभार मानले.