गैरसमजामुळे ग़र्भवती महिलांचीलसीकरणाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:26 AM2021-08-13T04:26:54+5:302021-08-13T04:26:54+5:30

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अगोदर गर्भवतींनी लस घेऊ नये, नंतर १४ आठवडे पूर्ण न झालेल्या गर्भवतींनी लस घेऊ नये, असे ...

Back to immunization of pregnant women due to misunderstanding | गैरसमजामुळे ग़र्भवती महिलांचीलसीकरणाकडे पाठ

गैरसमजामुळे ग़र्भवती महिलांचीलसीकरणाकडे पाठ

Next

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात अगोदर गर्भवतींनी लस घेऊ नये, नंतर १४ आठवडे पूर्ण न झालेल्या गर्भवतींनी लस घेऊ नये, असे सांगितले. याबाबत वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शक सूचनांमध्ये वारंवार बदल झाला. अखेरीस आता सर्व गर्भवती महिलांनी लस घ्यावी असे म्हटले आहे. सध्या मंगळवेढा शहर व तालुक्यात ३ हजार ६२६ गर्भवती महिलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १ हजार २१० गर्भवती महिलांची नोंद झाली आहे.

गैरसमजातून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गर्भवती महिलांना प्राधान्याने लसीकरण करण्याचे आरोग्य प्रशासनाने नियोजन केले असल्याची माहिती तालुका कार्यालयाच्या वतीने प्रदीपकुमार भोसले यांनी दिली. बेडरेस्ट रुग्णांप्रमाणे गर्भवती महिलांनाही घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे. लसींचे डोस राखीव ठेवून गर्भवतींसाठी विशेष लसीकरण मोहीम प्रशासनाने राबवावी, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी केली आहे.

---

गर्भवतींनी लस घ्यावी; भीती बाळगू नये

ज्या गर्भवती महिलांना साडेतीन महिने पूर्ण झाले आहेत, त्यांच्या गर्भातील बाळाचे हृदय, लिव्हर यासह प्रमुख अवयवांची पूर्ण वाढ झालेली असते. त्यामुळे १४ आठवडे पूर्ण झालेल्या गर्भवती महिलांनी लस घेण्यास काही हरकत नाही. संकोच बाळगू नये. लस घेतल्याने माता व बाळ या दोघांना कोरोनापासून संरक्षण मिळेल. स्तनदा मातांनीही कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेऊन स्वतःसह आपल्या बाळाला सुरक्षित करून घ्यावे. लस प्रभावशाली आहे. त्यामुळे कोणताही गैरसमज बाळगू नये, असे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. अश्विनी डोके यांनी सांगितले.

120821\img-20210630-wa0080-01.jpeg

डॉ अश्विनी डोके स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ मंगळवेढा

Web Title: Back to immunization of pregnant women due to misunderstanding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.