पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आठ रेल्वे गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 11:54 AM2018-07-04T11:54:28+5:302018-07-04T11:56:09+5:30
रद्द गाड्या पुन्हा सुरू : १९ ते २८ जुलैदरम्यान प्रवासी फेºया
सोलापूर : पुण्यात पादचारी पूल उभारला जात नसल्याने रद्द करण्यात आलेल्या गाड्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत़ वारकºयांच्या सेवेसाठी या गाड्या १९ ते २८ जुलैदरम्यान धावणार असल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक आऱ के़ शर्मा यांनी दिली़
पुणे विभागात पादचारी पूल उभारला जात आहे़ या कारणास्तव मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाºया काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या़ दरम्यान, आषाढी वारी आल्याने वारकºयांची गैरसोय होणार आहे़ ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने या गाड्या वारी काळात सेवेसाठी सुरू केल्या आहेत़
वारी सेवेसाठी गाड्या...
- - नांदेड-दौंड (५७५१६) पॅसेंजर कोपरगाव-दौंडदरम्यान रद्द करण्यात आली होती़ ती १७ ते ३१ जुलैदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - दौंड-नांदेड (५७५१५) पॅसेंजर दौंड-कोपरगावदरम्यान रद्द करण्यात आली होती़ ही गाडी १८ जुलै ते १ आॅगस्टदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - पुणे-निजामाबाद (५१४२१) पॅसेंजर १४ ते ३० जुलैदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - निजामाबाद-पुणे (५१४२२) पॅसेंजर १६ जुलै ते १ आॅगस्टदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - निजामाबाद-पंढरपूर (५१४३३) पॅसेंजर १५ ते ३१ जुलैदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - पंढरपूर-निजामाबाद (५१४३४) पॅसेंजर १६ जुलै ते १ आॅगस्टदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - साईनगर-पंढरपूर (११००१) एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावते़ ही गाडी १७ ते ३१ जुलैदरम्यान पुन्हा धावणार आहे़
- - पंढरपूर-साईनगर (११००२) एक्स्प्रेस ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी १७ ते ३१ जुलैदरम्यान पुन्हा धावणार आहे़